
Amity university girls fighting video viral
नोएडा येथील ॲमेटी युनिव्हर्सिटीच्या तरुणींमध्ये छोट्याशा वादावरुन जोरदारा हाणामारी झाली आहे.एकमेकींच्या आई वडिलांवरुन शिविगाळ करत या तरुणींनी एकमेकांनी मारायला सुरुवात केली आहे. दोघींनी एकमेकांच्या झिंझ्या उपटल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात बसल्या आहेत. दोघेही एकमेकांनी शिविगाळ करत आहे. यातील एक तरुणी तुझ्या बापाची जागा आहे का असे दुसरी म्हणते? यावरुन दुसऱ्या तरुणीला राग येतो आणि तिच्यावर हल्ला करते. लाल ड्रेसमध्ये असलेली तरुणी तिला काळ्या ड्रेस मध्ये असलेल्या तरुणीचे केस ओढते. हे पाहून आसपासच्या मुली त्या दोघींनी थांबवायला येतात. तुम्ही पाहू शकता की, दोघीही एकमेकींचे केस ओढत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
Latest lafda from Amity University, My today’s internet bill is worth it 😂 pic.twitter.com/xh90f0bimi — Chota Don (@choga_don) December 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @choga_don या अकाउंटवर शेअर करण्यात आल्या आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, पोरी भांडणं करताना एकमेकांच्या झिंझ्या का उपटतात? तर दुसऱ्या एकाने, मुलींची भांडणे खूप साधी असतात, ज्याने केस जोरात धरले तो जिंकला असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने भांडणे कोणत्याही कारणावरुन असूदेत, केस ओढणे कम्पलसरीच आहे असे म्हटले आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.