(फोटो सौजन्य – Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक पॉर्क्यूपाइन नावाचा काटेरी प्राणी महिलेच्या जवळ बसून तिच्याकडे एकटक बघत असल्याचे दिसते. प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर जीवघेणे काटे पसरलेलं असतात पण तरीही महिला त्याला आपल्यापासून दूर करत नाही आणि त्याचा चेहरा आपल्या हातात घेऊन त्याला मायेने कुरवाळू लागते. तिचे हे प्रेम प्राण्याच्या मनालाही भिडते आणि तो महिलेच्या आणखीन जवळ जाऊन तिने दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतो. जंगलातील प्राणी माणसांवर सहसा विश्वास ठेवत नाही अशात प्राणी विश्वास ठेवून आपल्या जवळ येत आहे ही भावना फार खास आहे. व्हिडिओतील प्राण्याचा विश्वास आणि महिलेची निस्वार्थी माया प्रशंसनीय आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @tv1indialive नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘महिलेने पॉर्क्यूपाइन असे कुरवाळले जणू तो तिचा पाळीव प्राणी आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेवटी आपल्या सर्वांनाच प्रेम हवे असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई शेवटी आईच असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांना आपल्याकडून फक्त प्रेमच हवे असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






