
fake snow in manali video goes viral
सध्या सोशल मीडियावर असाच एक कुल्लू-मानलीमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पर्यटकांना बर्फ दाखवण्याचे आश्वासन टूर कंपन्यांनी दिले होते. मात्र त्यांच्यासोबत मोठा स्कॅम झाला आहे. प्रत्यक्षात मनालीमध्ये कुठेही बर्फ नाही. पर्यटकांसाठी केवळ एक बर्फाचे मैदान तयार करण्यात आले आहे. या मैदानवरील बर्फापेक्षाही जास्त बर्फ फ्रीजमध्ये मिळेल असा दावा या व्हायरल व्हिडित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एका छोट्याशा बर्फाच्या मैदानावर काही पर्यटक खेळताना, स्कीईंग करताना दिसत आहे.
वय तर फक्त एक आकडा! ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @pankaj_k9142_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अरे भाऊ किती बर्फ पडलायत… तुला दिसत नाहीय का? अशी टिका केली आहे, तर दुसऱ्या एकाने एवढ्याशा बर्फासाठी सर्वजण एवढ्या लांब का गेले आहेत? असा मजेशीर प्रश्न केला आहे. तसेच एकाने याच्यापेक्षा तर जास्त माझ्या घराच्या फ्रिजमध्ये बर्फ पडलाय असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसेच टूर कंपन्यां लोकांसोबत मोठा स्कॅम करत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.
तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ! धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस अन्…, भयावह VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.