वय तर फक्त एक आकडा! ७० वर्षाच्या आजीने दमदार डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका फॅमिली फंक्शनमध्ये आजी ठुमके मारतानाा दिसत आहे. त्यांचे एक्सप्रेशन्स, आत्मविश्वास पाहून तरुणाई देखील लाजेल अशा अंदाजात त्यांना डान्स केला आहे. सर्वजण आजींचे कौतुक करत आहेत. हरियाणाच्या या रोहतकच्या आजीने सर्वांचे मन जिंकले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजींचा डान्स कार्यक्रमातील सर्वांनी एन्जॉय केला आहे. एक मुलगी आजीच्या मागे उभे राहून डान्स करताना दिसत आहे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आनंद होईल.
तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ! धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस अन्…, भयावह VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @saini_.82 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने वाह, काय जबरदस्त डान्स केला आजींनी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने जुने खेळाडू आता मैदानात उतरले आहेत असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने या वयातही एवढी एनर्जी, वाह असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






