तरुणांच्या डोक्यात रिल्सचे खूळ! धावत्या ट्रकखाली स्केटिंग चालवण्याचे धाडस अन्..., भयावह VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रक हायवेवरुन धावताना दिसत आहे. याच वेळी दोन तरुण स्केटिंग करत आहे. हे तरुण रिल्स शूट करत आहेत. यातील एक तरुण ट्रक खाली जाऊन स्केट करण्याचे धाडस करत आहे. मात्र त्याचे हे धाडस त्याला महागात पडण्याची शक्यता आहे. चुकून जरी ट्रक अचानक थांबला किंवा तरुण स्केट करत बाहेर येताना दुसऱ्या बाजून गाडी त्याला धडक देऊन गेली तरी अनर्थ घडण्याची शक्यता आहे. यामुळे रिल बनवणाऱ्याचा आणि शूट करणाऱ्या दोघांचाही जीव जाण्याची शक्यता आहे.
व्हायरल व्हिडिओ
Reels की भूख इतनी बढ़ गई,कि मौत के नीचे शूटिंग हो रही है। Reels के लिए जिंदगी को जुआ मत बनाओ।
आज स्टंट, कल एम्बुलेंस फर्क बस कुछ सेकंड का है। pic.twitter.com/YjlC3vau2R — TANVEER (@mdtanveer87) December 11, 2025
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर दोन्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच अशा पोरांवर कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने हे लोक असे स्टंट करणार, आणि मेल्यावर यांच्या घरचे ट्रक ड्रायव्हरला दोषी ठरवणार असे म्हटले आहे, तर आणखी एका नेटकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालण्यात काय शहाणपण आहे? असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






