
viral news marathi Grandma Dancing With Grandpa Wins Netizens Heart Video Viral Video
यामध्ये लग्नातीव समारंभाचे तर अनेक व्हिडिओ असतात. तुम्ही नवरा-नवरीच्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. त्यावर तुम्ही फिदाही झाला असाल. पण अनेकदा काही नातेवाईक असा भन्नाट डान्स करतात पाहून तुम्ही वाह, क्या डान्स था, क्या केमिस्ट्री थी असे बोल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक आजी-आजोबांचा भन्नाट असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नातवाच्या लग्नात आजींचा बोल्ड अन् रोमान्टिक अंदाज पाहून नेटकीर फिदा झाले आहे. त्यांच्यासोबत आजोबाही थिरकले आहे. पण आजींने दिलेले एक्सप्रेशन्स, त्यांच्या स्टेप्स, त्यातून व्यक्त केलेल प्रेम पाहून लोक त्यांची वाह वा करत आहेत. एका जुन्या हिंदू चित्रपटातील गाण्यावर आजी-आजोबा थिरकले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tanu.preeti या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यजू मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट्स करत आजींचे कौतुक केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ओल्ड इज गोल्ड… अम्मा इज बोल्ड असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केल आहे की, आजींनी त्यांच्या जवानीत अनेक पोरांना घायळ केले असणार, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने काय तो अंदाज, काय तो डान्स, केमिस्ट्री वाह, मजा आया गया असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी ओल्ड इज गोल्ड अशी प्रतिक्रियाही दिली आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लग्न…जबाबदारी अन् आवड! रॉकस्टार ‘गिटार सूने’चा आणखी एक VIDEO व्हायरल ; खरी कहाणी आली समोर
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.