लग्न...जबाबदारी अन् आवड! रॉकस्टार 'गिटार सूने'चा आणखी एक VIDEO व्हायरल ; खरी कहाणी आली समोर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ही व्हायरल रॉकस्टॉर सून एटा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने गाझियाबादच्या मोदीनगर परिसरातील मोहम्मदपूर येथील कादिम गावातील रहिवासी आदित्य गौतमशी लग्न केले आहे. तिचे नाव तान्या सिंग असून ती पेशाने असिस्टंट प्रोफेसर आहे. ३० नोव्हेंबर रोजी तिचा डोक्यावर पदर घेऊन गिटार वाजवताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तिला एका रात्रीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. तिने आप यू हमको मिल गये हे गाणे तिने गायले होते.
गिटार वाली बहू म्हणजेच तान्या सिंग सध्या सहारनपूर येथील मुन्नालाल देवी पदवी महाविद्यालयात असिस्टंट प्रोफ्रेसरप म्हणून काम करते. तिला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. तिच्या आईने देखील तान्याला संगीत शिकण्याची प्रेरणा दिली. कोविड मध्ये लॉकडाउनवेळी युट्युबवरुन तान्याने गिटार वाजवण्यास आणि गाणे गायला शिकली होती. तिला तिची ही आवड कधी एवढी प्रसिद्धी देईल याची कल्पना देखील नव्हती असे म्हटले आहे. तसेच तिने सांगितले की, तिच्या नवऱ्याने म्हणजेच आदित्यने देखील तिला कधी गिटार वाजवण्यास मनाई केली नाही. तिने सांगितले की,डोक्यावर पदर घेण्यास तिला कोणीही सक्ती केलेली नाही, तर ही एका नव्या नवरीची ओळख आहे.
तान्याचा नवरा आदित्य गौतम मूळचा गाझियाबादचा आहे. सध्या तो सहारनपूर येथील वीज विबागात एसडीओमध्ये कामाला आहे. दोघांची एका मॅट्रिमोनियल साइटवर भेट झाली होती. यानंतर कुटुंबाच्या संमतीने दोघांनी लग्न केले. तान्याने सांगितले की, तिच्या दोन्ही कुटुंबाकडून तिला नेहमीच पूर्ण पाठिंबा मिळाली आहे. तसेच इतर लोकांकडून तिला आशीर्वाद आणि प्रेमही मिळाले आहे. सध्या तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






