(फोटो सौजन्य – Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बेंगळुरूचा असल्याचे सांगण्यात येत आहे. बेंगळुरूच्या रस्त्यावर एका परदेशी पर्यटकाला ऑटो रिक्षात शांतपणे उभे असलेले एक वासरू दिसले. तो रिक्षात मजेत बसून बाहेरील दृश्यांची मजा घेत होता जणू हे त्याच्यासाठी रोजचे आहे. व्हिडिओमध्ये एकूण तीन प्रवासी बसलेले असतात. एक रिक्षाचालक, एक मालक आणि तिसरा वासरू… ते आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जात असतात. यावेळी मागून येणाऱ्या रिक्षातील परदेशी पर्यटकाने हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. वासराला अशी रिक्षाची सफर करताना पाहून तो थक्क झाला आणि त्याने लगेच हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करू पाहिले.
हा व्हायरल व्हिडिओ @pgsencio नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात लिहिले आहे की, ‘भारताकडे सर्वोत्तम आश्चर्ये आहेत’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बरं यावर काही भाष्य करू शकत नाही पण भारतात स्वागत आहे भाऊ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “परदेशी लोकांना ते हास्यास्पद वाटते पण जेव्हा ते त्यांच्या कुत्र्यांसह प्रवास करतात तेव्हा ते पूर्णपणे सामान्य असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भारत नवशिक्यांसाठी नाहीये”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






