(फोटो सौजन्य – Instagram)
अशात आता सोशल मिडियावर महिलेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात ती मद्यधुंद अवस्थेत जमिनीवर झोपल्याचे दिसते. यावेळी तिथे कुटुंबिय आणि पोलिस उपस्थित असल्याचेही दिसून येते. व्हिडिओत मागून मुलाच्या रडण्याचा आवाजही ऐकू येतो. आपल्या आईला असे जमिनीवर पडल्याचे पाहून तो घाबरतो पण महिला मात्र पूर्णपणे दारुच्या नशेत बुडालेली असते. ही घटना आपल्याला कलियुगातील एक कटू सत्य दाखवते जिथे एक आई आपल्या मुलाऐवजी आपल्या दारुच्या नशेला प्रथम प्राधान्य देते.
माहितीनुसार, महिलेने भाड्याने ई-रिक्षा बुक केली होती. दारुचे सेवन करण्यासाठी ती आपल्या मुलाला चालकाच्या स्वाधीन करत जवळील बारमध्ये एंट्री घेते. यानंतर मुलाच्या सुरक्षिततेबद्दल चिंतीत होऊन ई-रिक्षा चालक स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होतात आणि मुलाला आपल्या ताब्यात घेतात. मुलाला सोपवण्यापूर्वी पोलिस माहितीची पडताळणी करताना दिसले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात महिला मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे दिसते. मागून मुलाच्या रडण्याचा आवाज येत असतो. रस्त्यावर अन्य लोकही हे सर्व दृश्य पाहत असतात आणि यातीलच एकाने महिलेचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोकांनी महिलेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून लहान मुलासाठी खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @ilovegurgaon.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ऑटो रिक्षाचालकाचे आभार, नाहीतर मुलाला असे दुसऱ्याच्या भरोश्यावर ठेवून त्याच्यासोबत काहीही घडू शकले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे माॅडर्न जगातील माॅडर्न लोक आहेत ज्यांना आपल्या मुलाचीही काळजी नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






