
Shocking Viral Video
नेमकं काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बाजाराचे दृश्य दिसत आहे. लोक ये-जा करत आहे. याच वेळी उंचीने छोटा असलेल्या एक व्यक्ती बाजारात येतो. व्यक्ती शर्ट-पँट घालून नीट चालत असतो. पण यानंतर जे पाहायला मिळते ते धक्कादायक आहे. हा व्यक्ती शर्ट काढतो, यानंतर आपले पाय दुमडून अपंग असल्याचे नाटक करतो. व्यक्ती जमिनीवर लेटतो आणि आंग वाकडे करुन झोपतो. त्याच्यासमोर एक भांडे ठेवलेले असते. तो भिक मागू लागतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की, व्यक्तीच्या चेहऱ्यावर दु:खाचे भावही भिकारी बनताच उमटले आहे. या व्यक्तीने स्वत:ला दयनीय, असहाय्य दाखवले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @raj_kii_baat या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हैराणजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने हे खरे वास्तव आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मजेशीर अंदाजात भाऊ कधीच आजारी पडल्याची सुट्टी घेत नसेल असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने ही लोकच ऑफिसमध्ये काम करणाऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवतात असे म्हटले आहे. सध्या व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.