OMG! एक वर्षांच्या चिमुरड्याने चावून चावून सापाला केले ठार, अवस्था पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का
रोज अनेक विचित्र घटना घडल्याचे समोर येत असते. या घटना अनेकदा आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या बिहारमध्ये अशीच एक आश्चर्यकारक घटना घडून आली आहे. इथे एक वर्षाच्या चिमुरड्याने असे कृत्य केले की, हे ऐकून तुमची पायाखालची जमीन हादरेल. तुम्हाला साप हा प्राणी तर माहितीच असेल. आपल्या विषासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या जीवाला नुसते कोणी बघितले जरी तरी अनेकांची पळता भुई एक होते. अशातच आता बिहारमध्ये तर चक्क एक वर्षाच्या लहान मुलाने या जिवंत सापाला चावल्याची घटना समोर आली आहे. यांनतर नक्की काय झाले, ते सविस्तर जाणून घ्या.
बिहारमधील ही घटना आहे. यावेळी ही चिमुरडा खेळत होता. खेळत असताना अनावधानाने या चिमुरड्याने जिवंत सापाला तोंडात घातले आणि चावून चावून त्याला मारून टाकले. त्याने हे कृत्य केल्याचे पाहताच मुलीच्या आईने ताबडतोब आपल्या तोंडातून साप बाहेर काढला आणि बाळाला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी बाळावर प्राथमिक उपचार करून त्याला निरोगी असल्याचे घोषित केले.
हे प्रकरण फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमुहर गावातील आहे, जिथे शनिवारी हे लहान मुल आपल्या घराच्या गच्चीवर खेळत होते, तेव्हा हा साप घराच्या टेरेसवर रेंगाळत आला, जिथे ही चिमुरडा खेळत होता. सापाला पाहताच या चिमुरड्याने लहानग्या सापाला पकडले आणि त्याच्याशी खेळायला सुरुवात केली आणि खेळता खेळता त्याने सापाचे बाळ तोंडात दाबले आणि त्याला चावायला सुरुवात केली. सापाचा चावा घेतल्याने त्याचवेळी त्याचा जागीच मृत्यू झाला.
हेदेखील वाचा – मुलावर तलवारीने हल्ला झालेला पाहताच हल्लेखोरांना भिडली आई, पहा कशी हल्लेखोरांची पळताभुई एक झाली
फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जमुहर गावात राहणारे राकेश कुमार यांना 1 वर्षाचा मुलगा रियांश कुमार आहे जो आता पूर्णपणे निरोगी आहे. मात्र, हा साप किती घातक ठरू शकतो, हे त्या एका वर्षाच्या चिमुरड्याला समजले नसावे. हा साप इतर कोणाला दिसला असता तर तो पळून गेला असता आणि हा साप कुणाला चावला असता तर त्याची प्रकृती बिघडली असती किंवा त्याचे जीवाचे काही बरेवाईटही होऊ शकले असते. दरम्यान आता ही घटना ऐकून अनेकजण आवाक् झाले आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.