viral video 3 year old little boy in China dancing video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. लहान मुलांचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा लहान मुले असे काहीतरी करतात की सर्वांना आश्चर्य वाटते. कधी एखाद्या प्रश्न विचारल्यावर त्याचे भन्नाट उत्तर देतात, तर कध त्यांच्या प्रश्नांनी आपल्या चकित करतात. तसेच तुम्ही चिमुकल्यांचे अनेक डान्स व्हिडिओ देखील पाहिले असतील. मोठ्यांना लाजवतील असा जबरदस्त डान्स हे चिमुकले मंडळी करतात. सध्या असाच एक भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ चीनमधील आहे. यामध्ये एक तीन वर्षाचा चिमुकला काही ग्रुपमध्ये डान्स करणाऱ्या लोकांना कॉपी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीनच्या बाजारपेठेत काही लोक ग्रुपने डान्स करत आहेत. तर काही लोक त्यांचा डान्स पाहत आहे. येथे मागच्या बाजूला एक चिमुकला ग्रुपमधील लोकांच्या प्रत्येक स्टेप्स हुबेहुब कॉपी करत आहे. चिमुकला अगदी प्रोफेशनल डान्सर असल्यासारखे वाटत आहे. अगदी एकही स्टेप त्याने चुकवलेली नाही. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
This 3 year old little boy in China started dancing with these Grannies and he’s amazing! His parents say he’s self taught and can dance to anything with a beat! 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 pic.twitter.com/DzYchmV9XT
— Suzie rizzio (@Suzierizzo1) May 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Suzierizzo1 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तीन वर्षाचा चिमुकल्या आजींसोबत डान्स करत आहे असे म्हटले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “हा तीन वर्षाचा असून भन्नाट डान्स करत आहे, मी काय करतोय माझ्या आयुष्यात?” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने युजरने “हा चिमुकला प्रोफेशनल डान्स आहे, किती छान डान्स करत आहे.” असे म्हटले आहे. आणखी एकाने हा डान्सर होण्यासाठीच जन्माला आला, पुढे जाभन स्टार होणार नक्कीच असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.