(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज इतके अजब आणि अनोखे असतात की त्यातील दृश्य नेहमीच आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात. लोक व्हायरल होण्यासाठी इंटरनेटवर नवनवीन जुगाड शेअर करतात तर काही स्टंट्स करू पाहतात, याचबरोबर इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात, ज्यातील थरार नेहमीच आपल्याला थक्क करून जातो. आताही इथे असाच एक थरारक पण तितकाच रंजक असा व्हिडिओ शेअर झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भयानक आहेत की ती पाहून लोक हादरून गेली आहेत. यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाण्याचा राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मगरीसंबंधित आहे. आपल्या ताकदीने आणि चपळतेने मगर अनेक प्राण्यांची शिकार करते. अशात या भयानक शिकारीसमोर जाणे कोणत्या साहसाहून कमी नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एका ठिकाणी मगरींचा संपूर्ण घोळखा दिसून येत आहे आणि याच मगरींमध्ये एक माणूस उभा राहून त्यांना मांस खाऊ घालताना व्हिडिओत दिसून आले. मगर हा मांसाहारी प्राणी आहे अशात तो माणसांनाही खायला मागेपुढे बघत नाही. अशात लोक मगरीपासून दूर राहणे सुरक्षित मानतात, मात्र व्हिडिओतील या दृश्यात व्यक्तीचे हे साहस आणि धाडस पाहून लोक अचंबित झाले आहेत. व्यक्ती मगरींच्या घोळख्यात उभा असून त्याच्या हातात यावेळी एक पिशवी दिसून येत आहे. या पिशवीत मांसाचे काही तुकडे असतात जे तो मगरींना खाऊ घालत असतो. हा व्हिडिओ नक्की कुठला हे तर ठाऊक नाही मात्र यातील दृश्य काही सामान्य नाहीत.
Bhai ka Yamraj ke sath Uthna Baithna hai😂😂 pic.twitter.com/t19fVpc1X4
— Guru Ji (@Guruji___) June 1, 2025
हा व्हिडिओ @Guruji___ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भावाचं यमराजसोबत उठणं बसणं आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारोंच्या व्युज मिळाल्या असून अनेक लोकांनी याच्या कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ यमराजचा चांगला मित्र आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला अजिबात भीती नाही वाटत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.