
दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा... अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची सुरुवात एका खुल्या मैदानातून सुरु होते. मांजरींचा एक मोठा गट रिंगण करत एक मजेदार फाईट पाहत असतात. ही फाईट कोणत्या मोठ्या प्राण्यांमध्ये नाही तर इवल्याश्या दोन उंदरांमध्ये सुरु होती. दोन्ही उंदीर जमिनीवर उभे राहून एकमेकांना पकडून जमीनदोस्त करण्याच्या उद्देशात असतात. उंदरांच्या या लढाईत नक्की कोण विजयी ठरणार हे पाहण्यासाठी मांजरीही फार लक्ष देऊन ही फाईट पाहत असतात. लढाईत कधीकधी एक उंदीर दुसऱ्याला धरतो आणि दबाव आणतो, तर कधीकधी दुसरा चतुराईने स्वतःला सोडवतो आणि बदला घेतो. या संपूर्ण दृश्यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित एकही मांजर उंदरांवर हल्ला करत नाही. लोकांनी आता हे दृश्य वेगाने शेअर करायला सुरुवात केली आहे. काहींचे म्हणणे आहे की, मांजरींनी भूक नसेल म्हणून त्यांनी हल्ला केला नाही तर काहींनी म्हटलं की, त्यांनी लढाईत व्यत्यत आणायचा नसेल.
दरम्यान लढाईचे मजेदार दृश्य @onl.y._.pets नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मांजरी त्यांच्या अन्नाची लढाई पाहत आहेत ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मांजरी म्हणतील: हा सामना संपू दे, मग मीही ग्राउंडमध्ये येतो ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हाऊसफुल शो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.