मुंबईतील महिलेने तब्बल 9.4 लाख रुपयांची स्टारबक्स कॉफी केली ऑर्डर! Zomato ने शेअर केला खास Video, एकदा पहाच
सध्या कॉफीचे वेड दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांच्या दिवसाची सुरवात कॉफीने होत असते. कॉफीने कामात लक्ष लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते तसेच यामुळे आळस आला असेल तर तो दूर होतो. लोकांचे कॉफीवरचे प्रेम बघता आता बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची कॉफी उपलब्ध आहे. मोठ मोठ्या शहरात खास कॉफीसाठी प्रसिद्ध असणारे अनेक कॅफे आहेत. यातीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे स्टारबक्स. आजची व्हायरल बातमी स्टारबक्सनिगडितच आहे. कॉफीसाठीचे वेड तुम्ही अनेकदा पाहिले असेल मात्र आजची ही बातमी ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. आम्हला खात्री आहे की, कॉफीसाठीचे असे वेड तुम्ही याआधी कुठेही बघितले नसावे.
आजकाल ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्सवरून अन्नपदार्थ मागवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपले आवडते पदार्थ ऑर्डर करण्यासाठी लोक काही पैसे यावर उधळतात हे तर आपल्याला माहितीच आहे मात्र मुंबईतील एका तरुणीने चक्क एका कॉफीसाठी तब्बल 9 लाख रुपयांचे बिल जमा केले आहे. या तरुणीचे नाव आहे मिश्कॅट, ती झोमॅटो द्वारे स्टारबक्स वरून दररोज आपली आवडती कॉफी ऑर्डर करत असे. तिचे कॉफीवरचे प्रेम बघता आता झोमॅटोने यावर एक जाहिरात बनवली आहे. यामध्ये मिश्कॅटचे कॉफीवरचे विलक्षण प्रेम दाखवण्यात आले आहे.
झोमॅटोचे मार्केटिंग हेड साहिबजीत सिंग साहनी यांनी शेअर केलेल्या जाहिरात फाईलमध्ये, मिश्कतची आई तिच्या मुलीच्या कॉफीच्या खर्चाबद्दल जाणून घेतल्यावर संतापलेली दिसते. जेव्हा तिने पैसे परत मागितले, तेव्हा स्टोअर मॅनेजर हस्तक्षेप करतो आणि तिला ‘मिश्कॅट स्पेशल’ कॉफी ट्राय करून पाहण्यास उत्तेजित करतो. आपल्या मुलीला खास कॉफी का आवडते हे समजल्यावर मिश्कौतची आई भावूक होते. त्यानंतर कंपनी ग्राहकांना डिस्काउंट “मिश्कौत” कूपन कोड ऑफर करते.
हेदेखील वाचा – निर्जन ठिकाणी दिसून आले ‘पाताळ लोक! व्यक्ती आत गेला अन् भयावह गोष्टी… Video एकदा पहाच
याचा व्हिडिओ लिंक्डइनवर शेअर करताना साहनी यांनी लिहिले, “मुंबईतील मिश्कॅटने झोमॅटोवर 𝐒𝐭𝐚𝐫𝐛𝐮𝐜𝐤𝐬 कडून ₹9.4 लाखांपेक्षा जास्त ऑर्डर केली आहे. आम्हाला हे तयार करू दिल्याबद्दल तिच्या आईचे विशेष आभार. ” दरम्यान या क्रिएटिव्ह जाहिरातीने आता अनेक युजर्सचे लक्ष वेधले आहे. यावर आता अनेकांच्या प्रतिक्रया येत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिने माझे संपूर्ण सीटीसी प्यायले. LOL”. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ठीक आहे, म्हणून मिश्कॅट झोमॅटोचा स्टॉक पंप करत आहे.”