जेव्हा आपण कुठेतरी जातो तेव्हा आपण आपल्यासाठी योग्य नसलेल्या कोणत्याही ठिकाणी न जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र काहीवेळा अशी ठिकाणे असतात जिथे भेट देणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र तरीही, काही लोक इतके धाडसी असतात की ते निर्जन ठिकाणी जातात आणि होत्याच नव्हतं करून बसतात. सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही थक्क करतात मात्र आजचा हा व्हायरल व्हिडिओ तुमच्या पायाखालची जामीन हादरवेल.
सध्या अशाच एका निर्जन ठिकाणी एक तरुण गेला आणि त्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा उलगडा झाला. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली बॅग अशा ठिकाणी टाकत आहे, ज्यामध्ये अंडरवर्ल्ड प्रत्यक्षात दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही घाबरून जाल कारण या जागेचा अंतच होताना दिसत नाहीये. त्याच्या आत दिसणारे दृश्य साक्षात पाताळ लोकापेक्षा कमी वाटत नाही. जो व्यक्ती हा व्हिडिओ बनवत होता तो व्यक्तीही आतले दृश्य पाहून हादरला आणि आणखीन आत जाण्यासाठी घाबरू लागला.
हेदेखील वाचा – काळ आला होता पण वेळ आली नव्हती! मद्यधुंद अवस्थेत व्यक्ती रेल्वे रुळावर बसला, अंगावरून ट्रेन गेली अन्… Video Viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या व्यक्तीने सर्वप्रथम आपली बॅग एका खोल खड्ड्यात फेकली. हा अरुंद खड्डा इतका भयानक दिसतोय की, याला पाहताच तुम्ही याच्या आत जाण्याचा विचारही करणार नाहीत. बॅग फाकल्यानंतर व्यक्ती त्याच्या आत जाऊ लागतो. यानंतर तो जे दृश्य पाहता ते खूप भीतीदायक आहे. तो घाबरत हळू हळू पुढे जाऊ लागतो आणि आत त्याला फक्त एक अरुंद गुहा आणि भयंकर अंधार दिसू लागतो. व्हिडिओ संपतो मात्र या गुहेचा अंत होताना दिसत नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @undergroundbirmingham नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे किती भयानक आहे आणि ही व्यक्ती आत कशी जात आहे”. तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, “मी हे कधीच करू शकत नाही” तर तिसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे देवा! किती वेडेपणा आहे हा….”