viral video a young girl fell from a zipline horrifying video goes viral
सोशल मीडियाल रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे अपघातांचे थरराक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एक थरराक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीचा झिपलाईन करताना भीषण अपघात झाला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील मनाली येथे ही भयावह घटना घडली आहे. दरवर्षी मे-जूनच्या दरम्यान हिमाचलमध्ये अनेक पर्यटक लोक फिरायाला सुट्टीचा आनंद घ्यायला येतात. अशातच एक तरुणी देखील या ठिकाणी सुट्टीसाठी आली होती. यावेळी झिपलाईन करताना तिचा भीषण अपघात घडला. झिपलाईनचा आनंद घेत असताना अचानक केबल तुटल्याने तरुणी थेट ३० फूट दरीत कोसळली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे. तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
झिपलाईनची वायर तुटवल्याने मुलीचा अपघात झाला आहे. यामुळे तिला अनेक फ्रॅक्टर झाले आहे. या १२ वर्षीय मुलीचे नाव त्रिशा असून ती महाराष्ट्रातील नागपूरची रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशा आपल्या कुटुंबीयांसोबत मनालीला सुट्टीसाठी आली होती. यावेळी झिपलाईन करताना हार्नेसला जोडलेली केबल तुटली आणि तरुणी दरीत कोसळली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले. तसेच तिचे कुटुंबीय देखील तिच्यासोबत असल्याचे पोलिसांनी सांगतिले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
This is why adventure sports aren’t safe in India. In Manali, a young girl fell from a zipline—nearly 30 feet—and is now seriously injured. Anyone without proper experience starts these activities, and there’s no one to check. Action is only taken after a fatal accident happens. pic.twitter.com/Xy5LNYRDwe — Nikhil saini (@iNikhilsaini) June 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @iNikhilsaini या अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर पर्यटन ठिकाणांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेकांनी यावर तिच्या प्रकृतीबद्दल विचारले आहे. सोशल मीडियावर या घटनेटचा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हारल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.