
Maharashtra Skater Srushti Sharma Creates Guinness World Record, CM Devendra Fadnavis Congratulates Her ( महाराष्ट्राची स्केटर सृष्टी शर्माने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे अभिनंदन केले.)
सृष्टीने 8 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्रातील उमरेड येथे हा पराक्रम केला असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांनुसार, तिला जमिनीपासून केवळ 30 सेंटीमीटर उंचीवर लावलेल्या 51 आडव्या पट्ट्यांखालून जावे लागले. यात अट अशी होती की, तिने कोणत्याही पट्टीला स्पर्श नकरता तसेच ती खाली पाडू नये आणि तिचे हात किंवा बाहू जमिनीला अजिबात लागता कामा नयेत. सृष्टीने आपले पाय स्प्लिट पोझिशनमध्ये धरून हे आव्हानात्मक अंतर पूर्ण केले आणि 6.86 सेकंदांचा नवा विक्रम रचला आहे. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हारल होतोय.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करुन म्हटले आहे की, “महाराष्ट्राची तरुणी सृष्टी शर्माने विश्वविक्रम रचला! महाराष्ट्राची तरुण स्केटर, सृष्टी धर्मेंद्र शर्माने, लिंबो स्केटिंगमध्ये केवळ 6.86 सेकंदात 50 मीटर अंतर पार करून विश्वविक्रम रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेतली आहे. आम्हाला सृष्टीचा दृढनिश्चय, प्रतिभा आणि कामगिरीचा अभिमान आहे. सृष्टीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!”
महाराष्ट्राची युवा स्केटिंगपटू सृष्टी शर्माची विश्वविक्रमी कामगिरी! 🛼🏆 महाराष्ट्राची युवा स्केटिंगपटू सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने लिंबो स्केटिंगमध्ये 50 मीटरचे अंतर अवघ्या 6.86 सेकंदांत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दखल घेतली आहे.
सृष्टीची जिद्द, कौशल्य आणि तिच्या कामगिरीचा अभिमान आहे. सृष्टीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐 #Maharashtra #ShrishtiSharma #LimboSkating #GuinnessWorldRecords — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2026
स्केटर सृष्टी शर्मासाठी विक्रम मोडणे ही नवीन बाब नाही. तिने वयाच्या 11 व्या वर्षी पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. त्यावेळी, तिने 17 सेंटीमीटर उंचीवर ठेवलेल्या 25 बारखालून स्केटिंग करून ‘लोएस्ट लिंबो स्केटिंग ओव्हर 25 मीटर्स’ या प्रकारात एक विक्रम प्रस्थापित केला होता, जो आजही अबाधित आहे. 2017 मध्ये, तिने 17.78 सेंटीमीटर उंचीसह 10 मीटरवरील सर्वात कमी उंचीचे लिंबो आईस स्केटिंग’चा विक्रम केला होता. 2020 आणि 2021 मध्ये, तिने स्पीड लिंबो स्केटिंगमध्येही अनेक विक्रम प्रस्थापित केले.
सृष्टीने खेळा सोबत शिक्षण क्षेत्रांत सुध्दा उत्कृष्ट आहे. तिने नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण केली आणि नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या (MBBS) शिक्षणाला सुरुवात केली आहे.
अभ्यासासोबतच खेळाचा समतोल साधत, ती ‘सेव्ह अ गर्ल चाइल्ड’ (Save a Girl Child) सारख्या सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सशी बोलताना तिने सांगितले की, जर मुलींना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाले, तर त्या त्यांच्या कुटुंबाला आणि देशाला गौरव मिळवून देऊ शकतात. सृष्टीची कामगिरी तरुण खेळाडूंसाठी, विशेषतः मुलींसाठी, प्रेरणास्रोत बनली आहे.
लहान वयापासून सातत्याने विक्रम मोडणे हे तिच्या कठोर परिश्रमाचे, शिस्तीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. उमरेडच्या या कन्येने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला अभिमान मिळवून दिला आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि लोक त्याच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया देत आहेत.