जीव संपवण्यासाठी गेली अन् रेल्वे रुळावरच जाऊन झोपली, तरुणीचा Video Viral
बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील चकीया रेल्वे स्थानकाजवळ एक अजब प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार ऐकून तुम्हीही डोक्याला हाथ लावाल. इथे एक विद्यार्थिनी आपला जीव संपवण्याच्या उद्देशाने चक्क रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपली. आता पुढे काय झाले असावे याचा विचार करता अनेकांना तिच्यासोबत काही बरेवाईट झाल्याचा विचार पहिल्यांदा मनात येईल. मात्र तिच्यासोबत असे काहीही घडले नाही उलट ट्रेनला यायला उशीर झाल्याने ही तरुणी रेल्वे ट्रकवरच झोपून गेली. यानंतर नक्की काय घडले याविषयी जाणून घेऊयात.
सदर घटना बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील चकीया रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. मंगळवारी एक मुलगी आपला जीव संपवण्यासाठी जवळील रेल्वे ट्रॅकवर जाणून लेटते मात्र यानंतर बराच काळ कोणती ट्रेन येत नाही. ट्रेन उशिरा झाल्याने ही तरुणी त्या ट्रॅकवरच झोपून जाते. झोपलेल्या मुलीला लांबूनच पाहिल्यामुळे लोको पायलटने ट्रेनला ब्रेक मारला आणि बरोबर मुलगी झोपलेल्या ठिकाणी ट्रेन येऊन थांबली. लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे सदर तरुणीचा जीव वाचला मात्र यानंतर खरा गोंधळ सुरु झाला.
हेदेखील वाचा – इवलासा साप कसा भल्यामोठ्या गायीला गिळतो? एकदा पहाच, Viral Video पाहून व्हाल शॉक
मुलीला वाचवताच तिला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यास सांगितले गेले मात्र तरुणी आपल्या हातावर कायम राहत मला जीव द्यायचा आहे असे म्हणत रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यास नकार देऊ लागली. अखेर स्थानिक महिलांना बोलवून तिला बाजूला केले गेले. यामुळे रेल्वेला पुन्हा अर्धा तास उशीर झाला.
या घटनेचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकजण आता हा सर्व प्रकार पाहून अचंबित झाले आहेत. व्हिडिओबद्दल जर बोलणे केले तर. व्हिडिओच्या सुरवातीलाच एक मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडलेली दिसून येत आहे. यावेळी ट्रेन तिच्या अगदी समोर येऊन थांबली आहे. तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळे ती विद्यार्थीनी असावी, असा अंदाज बांधला जात आहे. यानंतर एक युवक येऊन मुलीला झोपेतून उठवतो आणि तिथे का झोपलीस? असा प्रश्न विचारतो. पण तरुणी रुळावरून उठण्यास तयार होत नाही. यानंतर काही स्थानिक महिला येऊन तिला पकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सदर तरुणी “मला मरायचे आहे, सोडा मला..”, असे म्हणत ओरडताना दिसते.
मोतिहारी- ट्रेन के आगे लेटी थी छात्रा, लोको पायलट ने इमरजेंसी ब्रेक लगाकर जान बचाई, लड़की हटने को नहीं थी तैयार!#Bihar #Motihari #RailwayTrack #train pic.twitter.com/6i5hL9BIat
— Humara Bihar (@HumaraBihar) September 10, 2024
हेदेखील वाचा – आजोबा जोमात महामंडळ कोमात! खिडकीतून बसमध्ये चढू लागले, पाय गेले आत अन् पोट अडकले बाहेर, Video पाहून हसू अनावर होईल
या घटनेचा व्हिडिओ @Humara Bihar नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मोतिहारी- ट्रेनसमोर पडली होती मुलगी, लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून जीव वाचवला, मुलगी हलायला तयार नव्हती! असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिचारीला मुलीला लोक शांत झोपू देत नाहीत.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोको पायलटला सलाम. “