काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक तरुण बसमध्ये जागा अडवण्यासाठी थेट खिडकीतून आत शिरत होता. पण बिचाऱ्याचं दुदैव म्हणजे खिडकी त्याचं वजन झेलू शकली नाही. अन् तो खिडकीसकट खाली पडला. मग एस.टी. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खिडकीसकट त्याला ऑफिसमध्ये नेले आणि नुकसान भरपाईचे पैसे त्याच्याकडून वसूल केले. मात्र आता असाच एक आणखीन मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून बाकी काही नाही पण तुम्हाला पोट धरून हसू नक्की येईल.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक आजोबा खिडकीतुन बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. आता तुम्हीच विचार करा हे आजोबा खिडकीसकट खाली पडले तर काय होईल? हा व्हायरल व्हिडिओ पाहून आता तुम्हालाही चक्रावल्यासारखे होईल. व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, एक आजोबा खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या प्रयत्नात ते चांगलेच अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – ‘शॉन द शिप’ कार्टून पोशाखात परेड; व्हिडीओ पाहून येईल बालपणीची आठवण
व्हिडिओत दिसून येते की, आजोबा खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते खिडकीतच अडकून बसतात. यावेळी त्यांचे पाय आत आणि पोट बाहेर असे सर्व चित्र दिसू लागते. एवढेच काय तर. त्यांचा हा प्रकार पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दीदेखील पाहायला मिळते. याचबरोबर, यावेळी बसचा कंडक्टरदेखील या आजोबांना असे करू नका आणि त्यांनी खाली उतरावे यासाठी विनवण्या करताना दिसून येतो. दरम्यान आता हा व्हिडियो पाहून अनेकजण पोट धरून हसत आहेत.
हेदेखील वाचा – “हमें तो लुटा OLA UBER ने, Rapido में कहा दम था, हमें जहाँ भेजा वहाँ… रिक्षावरची पुणेरी पाटी होत आहे Viral
हा व्हिडिओ @marathi_epic_jokes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेदार कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अप्पा ST वर धोतर टाकून पूर्ण सीट बुक करून घ्या.. अप्पा चा विषय लय हार्ड है”, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आबा आजीची पण जागा घ्या”, तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लहान पणी हे म्हतार किती चाबर असणार”.