ती भेट ठरली शेवटची! स्कूटरवर बसला अन् ... हृदयद्रावक मृत्यूचा Video झालाय Viral
सध्याच्या जगात कधी काय होईल ते सांगता येत नाही. आज एक आहे तर दुसऱ्या क्षणी दुसरेच काहीतरी घडताना दिसते. कोणाचा मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. कधी कधी लोक भयानक आजरातूनही बाहेर येतात तर काहींचा धडधाकट असतानाही त्यांचा अकाली मृत्यू होतो. अशा घटना अनेकांना अचंबित करून जातात. कधी कधी आपण विचारही केला नसेल असे प्रकार समोर येतात. सध्या अशीच घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका 18 वर्षीय तरुणाच्या मृत्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मेडियावर व्हायरल होत आहे. यातील त्याच्यासोबत झालेला अपघात बघून तुमचेही काळीज हळहळू लागेल.
हा सर्व प्रकार देशाची राजधानी दिल्लीमध्ये घडून आला आहे. या दुर्घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि असून आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर दिसते की, सोसायटीच्या आवारातील हा व्हिडिओ आहे. यात काही दुचाकी तर काही चारचाकी पार्क केलेल्या दिसून येत आहेत. काहीवेळाने इथे एक मुलगा आपल्या दुचाकीवर येऊन बसतो तो निघेल इतक्यात त्याचा मित्र तिथे येतो आणि ते दोघेही एकमेकांना गळाभेट करू लागतात.
हेदेखील वाचा – Viral Video: किंग कोब्राला पाहताच वाघाची हवा झाली टाईट, फणा काढताच कसा मागच्या मागे पळू लागला ते एकदा पहाच
दोघांनी मिठी मारल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच असे काही घडते ज्याचा कोणी विचारही केला नसावा. क्षणार्धात वरून एसीचे बाहेरचे युनिट त्यांच्या अंगावर धाडकन येऊन आपटते. हा हृदयद्रावक अपघात दिल्लीतील दोरीवाला परिसरात घडून आला आहे. अपघाती मुलांपैकी एकाचे नाव जितेश तर दुसऱ्याचे नाव प्रांशुला असे आहे. या अपघातानंतर दोघांनाही तातडीने रुग्णांलयात दाखल केले जाते, जिथे डॉक्टरांनी जितेशला मृत घोषित केले असून प्रांशुलावर अजूनही उपचार सुरु आहेत.
SHOCKING VIDEO – WATCH TILL THE END – Delhi: 19-Yr-Old Boy Dies After AC Falls On Him From 3rd Floor Of Building In Karol Bagh; Tragic CCTV Video Surfaces#Delhi #karolbagh #shocking pic.twitter.com/7cmAePFEYS
— B S Vohra (@vohrabs) August 18, 2024
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @B S Vohra नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये युजरने या सर्व घटनेची माहिती पुरवलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एसीच्या आऊटडोर युनिटचं स्टँड मोडल्याने ही घटना घडल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.