American boy sings India's National Anthem video goes viral
दरवर्षी १५ ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करतो. या दिवशी संपूर्ण देशात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सुटका मिळाली. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमनाचा दिवस आहे. यंदा भारत ७९ वां स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आपल्या देशाला ब्रिटांशापासून स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे पूर्ण झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर १५ ऑगस्ट निमित्त अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.
देश भक्तीपर गाणी, तसेच भारताचा समृद्ध इतिहास, भारताच्या स्वातंत्र्याची गाथा, तसेच स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विरांची गाथा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंटेट आपल्याला पाहायला मिळतात. भारताच्या स्वातंत्र्याविषयी केवळ देशातील लोकांनाच नव्हे तर परदेशी लोकांची देखील लोकप्रियता पाहायला मिळते. परदेशी लोक देखील भारताच्या देशभक्तीपर गीतांवर डान्स करताना, गाणी म्हणतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
यात एक अमेरिकन मुलगा भारताचे राष्ट्रगीत (National Anthem ) ‘जन गन मन’ गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. या व्हिडिओमध्ये एक १७ वर्षीय मुलगा राष्ट्रगीत ‘जन गन मन’ गात आहे. गेब मेरिट असे या मुलाचे नाव आहे. सांगण्यात येत आहे की गेबला भारताचे राष्ट्रगीत खूप आवडते. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गेब राष्ट्रगीत गात आहे. अगदी सुरेख आवाजात, तसेच स्पष्ट उच्चारणासह गेब राष्ट्रगीत गाताना दिसत आहे. त्याच्या आवाजात एक वेगळा उत्साह देखील पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @dishakpansuriya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, खूप छान गायले गेब, ऐकून आनंद झाला, तर दुसऱ्या एका युजरने आम्हाला अभिमान वाटतोय असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या कौतुकास्पद प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
FAQs (संबंधित प्रश्न)
भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे?
भारताचे राष्ट्रगीत ‘जन-गन-मन’ कवी रवींद्रनाथ टागौर यांनी प्रथम बंगाली भाषेत लिहिले आहे.
भारताचे राष्ट्रगीत कधी स्वीकारण्यात आले?
‘जन-गन-मन’ २४ जानेवारी १९५० मध्ये भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले.
भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो?
भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी ५२ सेकंद लागतात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.