(फोटो सौजन्य: Instagram)
हत्ती हा जंगलातील एक विशालकाय प्राणी आहे, जो आपल्या शांत आणि मनमिळावू स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्या बलाढ्य शरीरामुळे तो कुणालाही पायदळी तुडवू शकतो पण हा प्राणी शक्तीला नाही तर शांततेला अधिक महत्त्व देतो, त्याच्या यात वृत्तीमुळे तो अनेकांची मने जिंकतो आणि आताही हत्तीचा एक गोंडस व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे जो सर्वांनाच खुश करत आहे. व्हिडिओमध्ये एक भलामोठा हत्ती साजश्रृंगार करत आपली कंबर डोलावताना दिसून आला आहे, त्याचा हा नाच यूजर्सचे चांगलेच लक्ष वेधत असून लोक वेगाने हे दृश्य शेअर करत आहेत. चला तर मग व्हिडिओत नक्की काय दिसून आले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात मोकळ्या जागेत एक भलामोठा हत्ती नृत्य करताना दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आहे आणि यावेळी त्याने माणसांप्रमाणे साजश्रृंगार केलेला आहे जी व्हिडिओतील सर्वात लक्षवेधी बाब ठरत आहे. निळ्या रंगाची पँट, लाल रंगाचा शर्ट आणि डोळ्यांवर गाॅगल… इतकंच काय तर यावेळी त्याने डोक्यावर टोपी देखील घातलेली असते जी त्याच्या श्रृंगारात आणखीनच भर घालत असते. व्हिडिओमध्ये पुढे हत्ती एका गाण्यावर नाचताना आणि आपली कंबर डोलावतानीही दिसून येत आहे. हत्तीचे अनेक व्हिडिओ याआधीही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत पण साजश्रृगांत नाचणाऱ्या या हत्तीचा व्हिडिओ याआधी कधीही कुणी पाहिला नाही ज्यामुळे कमी वेळातच तो लोकंच्या पसंतीस पडला आहे. लोक हत्तीचा हा मनमोहक लुक आणि मजेदार डान्स पाहून चांगलेच खुश झाले असून इंटनेटवर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे.
गजराजाला छेडणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, धावत पळत आला अन् पायदळीच तुडवला जीव; थरारक Video Viral
हत्तीच हा व्हायरल व्हिडिओ @purvii_ira नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे, तो किती गोड नाचत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फार सुंदर” आणखीन एका यूजरने लिहिले आहे, “गोंडस बाळ, पार्टीसाठी तयार होऊन बसला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.