viral video Body Builder bride woman's bride look video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून आश्चर्याचा धक्का बसतो, तर कधी मनोरंजक व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड याशिवाय अनेक भांडणांचे, तसेच फिटनेस संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल फिटनेसच्या बाबतीत केवळ पुरुषच नाही तर आता महिलाही तेवढ्याच दक्ष झाल्या आहेत. अगदी पुरुषांप्रमाणेच बॉडी वैगेर बनवणे व्यायाम करणे यांसारख्या गोष्टींमध्येही महिला पुढे आहेत.
सध्या अशाच एका बॉडीबिल्डर महिलेचा व्हिडिओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचे बायसेप्स दाखवताना दिसत आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेने नववधूचा लूक केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ही महिला अगदी साडी नेसून, दागिने घालून नवरीसारखी सजलेली आहे. ही महिला आपले शक्तिप्रदर्शन करत आहे. या व्हिडिओने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @chitra_purushotham या अकाऊंटवर व्हायरल होत असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आज की मॉडर्न बहू असे लिहिलेले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत संपूर्ण सासरचे लोक घाबरले असतील असे म्हटले आहे. एका युजरने भाई, मुलांना पण लाजवेल अशी बॉडी आहे हीची एवढी फिटनेस असे म्हटले आहे. या मुलीचे नाव चित्र पुरुषोत्तम असे आहे. ही एक कर्नाटकातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आहे. तिच्या ऑफिसिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील असे बरेच फोटो शेअर करण्यात आले आहेत. मिस इंडिया फिटनेस आणि वेलनेस, मिस साउथ इंडिया, मिस कर्नाटक, मिस बेंगलुरू अशा अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा चित्राने जिंकल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.