Viral Video: पार्किंगमध्ये बाईक पार्क केल्याच्या कारणांवरून तरूणांमध्ये लाथा-बुक्क्यांनी हाणामारी; पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की अंगावर काटा येतो. तसेच तुम्ही अनेक स्टंटचे याशिवाय भांडणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही तरूण जोरदार एकामेकांना मारत आहेत. पार्किंगच्या कारणावरून भांडण झाल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगमध्ये दुचाकी उभी करण्यावरून तरूणांमध्ये वाद सुरू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट देखील केल्या आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, पार्किंगचा संपूर्ण परिसर दिसत आहे. अनेकजण गाडी पार्क करताना किंवा गाडी पार्किंमधून काढताना दिसत आहे. तिथेच काही तरूण एकमेकांना जोरदारा मारामारी करताना दिसत आहेत. एका तरूणाचा तर शर्ट काढून त्याला मारत आहेत. एवढेच नाही तर हे तरूण एकमेकांना काठ्या घेऊन मारत आहेत. संपूर्ण परिसरात गोंधळ उडालेला आहे. ही सर्व घटना तेथील एका व्यक्तीने कॅमेरात कैद केली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
पार्किंग में बाइक खड़ी करने का विवाद था। फिर ऐसा युद्ध शुरू हुआ कि लात–घूंसे, लाठी–डंडे चले। सड़क पर गिरा–गिराकर पिटाई हुई।
📍ग्रेटर नोएडा, यूपी pic.twitter.com/fz5Wl3c1Qo— Sachin Gupta (@SachinGuptaUP) November 12, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफर्म एक्सवर @SachinGuptaUP या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत अनेकांनी पाहिले आणि मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आता पोर पण महिलांसारखे भांडायला लागले आहेत. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, राडाच. आणखी एका युजरने म्हटले आहे की, असे वाटत आहे की एकालाच बाकिचे तिघे मिळून जोरदार मारत आहेत. तिशऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा छोट्या गोष्टीवरून कोणी भांडते का? हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – आता तर हद्दच झाली! महिलेने असं काही चोरी केलं की; व्हिडिओ पाहून कपाळाला हात लावाल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.