प्रवाशांच्या जीवाशी खेळ! मद्यधुंद असवस्थेतील बस चालकाचा VIDEO व्हायरल; लोकांचा संताप अनावर म्हणाले...
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा चित्र-विचित्र, आश्चर्याचा धक्का देणार किंवा आपले मनोरंजन करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. डान्स, जुगाड, स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून तर अनेक अपघातांच्या घटना घडत असून त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
काही अपघात ही नैसर्गिक असतात, पण बऱ्याचदा चालकाच्या चुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडून येतात. वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणे, मद्यधूंद असवस्थेत बस चालवणे अशी अनेक कारणे आहेत. तसेच मागील काही दिवसांत दारु पिऊन बस चालवल्याच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असात व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये बस चालक मद्यधूंद अवस्थेत बस चालवत आहे.
मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवताना बस चालक
व्हायरस होत असलेला व्हिडिओ बदलापूरमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बस चालक दारुच्या नशेत गाडी चालवत आहे. याच बसमधील एक प्रवाशाने त्याचा व्हिडिओ बनवला आहे. प्रवासी बस चालकताल दारु पिऊन बस चावलवत असल्याने ओरड आहे. ही संपूर्ण घटना दुसऱ्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
बस चालकाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @metro_news24x7 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “मद्यधुंद अवस्थेत एसटी चालकाने चालवली बस” असे लिहिले आहे. हा व्हिडिओ चार महिन्यांपूर्वी असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, भरतीच्या वेळीच अशा लोकांना काढून टाकले पाहिजे. आणखी एकाने हे नेहमीचेच झाले आहे असे म्हटले आहे. तर काहींनी प्रशासन यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.