खतरों के खिलाडी! देशी दारु प्यायला अन् तरुण थेट विजेचा तारेवर...; VIDEO पाहून फुटेल घाम( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही पाहायला मिळते. जुगाड, स्टंट, भांडण आणि डान्स रिल्स असे विविध कंटेटचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा आश्चर्याचा धक्का देणारे, घाम फुटेल असे व्हिडिओ देखील सतत व्हायरल होत असतात. तुम्ही दारु पिऊन स्टंट करणाऱ्यांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विजेच्या तारांवर जाऊन झोपलेली आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून हैराण झाले आहेत. ही घटना आंध्रप्रदेशातील मन्यम जिल्ह्यात घडली आहे. या व्हिडिओमध्ये विजेच्या तारांवर झोपलेला वक्ती दारुच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दारुच्या नशेत विजेचा खांबावर जाऊन झोपलेली आहे. अगदी कपडे वाळत घालतो तसेच ही व्यक्ती झोपलेली आहे. गावकऱ्यांनी त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र या व्यक्तीला कशाचीही सुद नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी विजेचा प्रवाह त्वरित खंडित केल्याने त्याचा जीव वाचला असल्याची माहिती मिळाली आहे. नाहीत एका झटक्यात त्याचा जीव गेला असता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
మద్యం మత్తులో కరెంట్ తీగలపై పడుకున్నాడు
మన్యం జిల్లా పాలకొండ మండలం ఎం.సింగిపురంలో గ్రామస్థులను హడలెత్తించిన ఓ తాగుబోతు
మద్యం మత్తులో కరెంటు స్తంభంపైకి ఎక్కుతుండటంతో చూసిన పలువురు వెంటనే ట్రాన్స్ ఫార్మర్ ఆపేశారు
అతను ఆగకుండా పైకి వెళ్లి ఏకంగా విద్యుత్ తీగలపైనే పడుకున్నాడు.… pic.twitter.com/0p7xLgvEm6
— Telugu Scribe (@TeluguScribe) December 31, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी व्यक्तीला ताब्यात घेतले असून तो विजेच्या तारेवर का झोपला याबाबत कोणतीही माहिती नाही. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून 2 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, देशी दारुची कमाल आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काय मूर्खपणा आहे हा.. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि लोकांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.