धक्कादायक! जळत्या चितेवर तरुणाचा अजब कारनामा; VIDEO पाहून नेटकरी आवाक् म्हणाले...(फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. जुगाड, स्टंट, भांडण आणि डान्स रिल्स यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. यामध्ये एका तरुणाने असा काही स्टंट केला आहे की, पाहणारे देखील थक्क झाले आहेत.
स्माशानभूमीचं नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या स्मशानभूमी हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. दिवसा देखील स्माशानभूमीत जाण्यासाठी लोक घाबरतात. मात्र, एका तरुणाने स्मशानभूमीलाच घर बनवले आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून तुम्ही पाहिल्यावर धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. या तरुणाने जळत्या चितेवर असे काही केले आहे की, तुम्ही याचा विचार देखील केला नसेल.
जळत्या चितेवर ठेवला तवा अन्…
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक स्माशानभूमी दिसत आहे. तिथेच एक तरुण देखील आहे. तसेच एका चितेवर अजूनही निखारे धगधगत आहेत. तरुण तिथे उभा असून त्याने चितेवर तवा ठेवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जळत्या चितेवर तवा ठेवून तरुण त्यावर भाकरी बनवून भाजत आहे. तसेच आजूबाजूल जेवणाची इतरही भांडी दिसत आहेत. त्याचे हे कृत्य पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nishantt023 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा भयानक व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, याला म्हणतात इतरांच्या चितेवर भाकऱ्या भाजणे, तर आणखी एकाने भावाचे यमराजबरोबर चांगले संबंध आहेत. तर अनेकांनी म्हटले आहे की, याला भिती कशी वाटत नाही असे करताना. अनेकांनी त्या तरुणास ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.