(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @chatori__amma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला मोबाईल स्क्रीनवर हळूहळू बोटे फिरवत असल्याचे दिसून आले आहे. तिचे हात थोडे थरथर कापत आहेत, परंतु शिकण्याची तिची उत्सुकता व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. नात ओजस्वी चतुर्वेदी तिच्या आजीला धीराने समजावून सांगते की कोणती बटणे दाबायची आणि कधी स्क्रीनला स्पर्श करायचा. हा क्षण केवळ तंत्रज्ञान शिकण्याचा नाही तर पिढ्यांमधील प्रेम आणि विश्वासाचे देखील सुंदर दर्शन घडवते. व्हिडिओला आतापर्यंत १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ७५,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ कॉलची गोष्ट नाही, तर प्रेम, संयम आणि आपलेपणा वयाच्या अडथळ्यांना कसे तोडू शकतो हे दाखवतो. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले आहे, “माझी आजी अक्षरशः प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे आणि तिला वाटेल तेव्हा ती सर्वांना फोन करते, ती आता प्रो झाली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझी नानी अगदी अशीच होती. मी तिला तिचा पहिला (आणि शेवटचा) अँड्रॉइड फोन दिला आणि ती सगळं शिकण्यासाठी खूप उत्सुक होती. यामुळे सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सुंदर व्हिडिओ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






