viral video couple romance on bike on highway stunt video from firozabad goes viral
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक मजेशीर, चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शिवाय यामध्ये कपल्सच्या रोमानस्चे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ भर रस्त्यात, हायवेवर खुले आम रोमान्स करतानाचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या जोडप्याला त्यांचा रोमान्स महागात पडला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्याविरोधात कारवाई झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण विना हेल्मेट बाईक चालवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने बाईकच्या टाकीवर एका तरुणीला ढोपवले आहे. दोघेही एकमेकांशी हसत हसत बोलत आहे. राष्ट्रीय महामार्ग फिरोजाबादवर ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार घडत असताना तिथूनच जाणाऱ्या दुसऱ्या दूचाकीस्वाराने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. जोडप्याने वाहतूकीचे नियम तोडले आहेत. दोघेही अगदी आनंदात दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावप प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी टीकेचा भडीमार केला आहे. या प्रकरणार फिरोजाबादच्या पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. फिरोजाबादचे एसपी सिची रविशंकर प्रसाद यांनी यावर, वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाची कारवाई आहे, असे न केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेशनल हाईवे पर अब चलने के नहीं, बल्कि रोमांस के लिए बन गए है! बाइक पर कपल का “लेटकर लव” वाला स्टंट देखकर तो लगता है, जैसे ट्रैफिक पुलिस को छुट्टी दे दी गई है ! हाईवे पर स्पीड और स्टाइल का ये “रोमांटिक राइड” देखकर कौन नहीं कहेगा—सुरक्षा बाद में, पहले प्यार चढ़े परवान! #फिरोजाबाद… pic.twitter.com/5OlnABpkE8
— Tushar Srivastava (@TusharSrilive) June 27, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TusharSrilive या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने केवळ निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने प्रशासनाने अशा गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.