जॉर्जिया मेलोनींना नेमकं काय झालं? नाटो शिखर परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधानांचे विचित्र हावभाव; VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नुकतेच नेदरलॅंडच्या हेग येथे नाटो शिखर परिषदत पार पडली. १७ ते २५ जून पर्यंत ही परिषदत होती. यावेळी नाटो देशांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती. नाटोमध्ये 27 युरोपीय देश, २ उत्तर अमेरिकन देशांचा समावेश आहे. यामध्ये इटली हा नाटोचा सदस्य आहे. या परिषदेवेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलतना त्यांनी विचित्र असे हावभाव दिले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. यावर नेटकऱ्यांनी मीम्सचा वर्षाव केला आहे. तसेच जॉर्जिया मेलोनींना नेमकं काय झाले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मलोनींची खिल्ली उडवत, बायडेनच्या सर्व गोळ्या खाल्ल्या काय असे म्हटले आहे, तर मेलोनींने ड्रग्ज वैगेरे घेतली की, काय असे म्हटले आहे. एका युजरने नक्की काय पाहिले मेलोनींनी असाही प्रश्न एकाने केला आहे.
What is wrong with her???pic.twitter.com/eOLORqLXbW
— Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) June 26, 2025
She looks like there’s a train coming 😅 pic.twitter.com/fuCRncGpRC
— ATM StakePool (Adapulse, World Mobile, Cardano) (@AtmPools) June 27, 2025
परंतु हा व्हिडिओ बनवटी असल्याचेही म्हटले आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी स्वत:हा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या पत्रकारांशी संवाद करताना दिसत आहेत. कोणत्याही प्रकारच्या विचित्र हावभाव त्यांनी दिलेला नाही. यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तुम्ही इतक्या सहज फसता? असा कचरा सोशल मीडियावर पसरवला जातो असा तुम्ही त्याचा तपासही करत नाही असे म्हटले आहे. सध्या हा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु यामुळे लोक किती सहजपणे अशा फसव्या गोष्टींना बळी पडतात हे चिंताजनक असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
L’Aia (Paesi Bassi), il mio punto stampa. pic.twitter.com/IZDXiiwODJ
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 25, 2025