अशा स्कूटी तुम्ही पाहिलीय का? व्यक्तीचा जुगाड पाहून हसू आवरणार नाही, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट यासांरखे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतात. या जुगाड करणाऱ्यांचे म्हणणेअसते की, यामुळे त्यांच्या वेळ वाचतो तसेच त्यांचा पैसाही वाचतो. अनेकदा काही जुगाड असे असतात की, त्याचा काही उपयोग होत नाही. तर अनेकदा असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात की, पाहून हसू आवरणे कठीण होऊ जाते.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्यक्तीने असा मजेशीर जुगाड केला आहे की, तुम्हाला हसू आवरणे कठीण होऊन जाईल. या व्यक्तीने स्कूटी आणि हेल्मेटचा भन्नाट जुगाड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्यक्तीच्या स्कूटीला एक नाही तर दोन दोन हॅंडल आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? तर तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहाच मग तुमच्या लक्षात येईल आणि हसून हसून पोट दुखेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती स्कूटीवरुन जात आहे. पाहिल्यावर असे वाटत आहे की, त्याची स्कूटी उलट्या दिशेने जात आहे. तुम्ही व्हिडिओ अजून थोडा वेळ पाहिला की लक्षात येईल, या व्यक्तीने ढचे हँडल मागे ठेवले आहे. तर मागच्या सीटवर हॅंडल जोडून मागची सीट पुढे सरकवली आहे. एवढेच नाही तर या व्यक्तीने हेल्मेटसाठी देखील भन्नाट जुगाड केला आहे. त्याने घरातील एक पॅस्टिकचा डबा डोक्यात घातला आहे. तुम्ही आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्कूटी पाहिल्या असतील पण अशी स्कूटी तुम्ही पहिल्यांदाच पाहाल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नयी स्कूटी मार्केट में आयी है 😂😂🤣🤣 pic.twitter.com/F9MryAlcUu
— Kattappa (@kattappa_12) December 4, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @kattappa_12 शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, मी तर डोळे चोळत बसलो आहे हे पाहून. आणखी एका युजरने म्हटले आहे की, याने इतर कंपन्यांना देखील मागे सोडले, काय मॉडेल आहे भाऊ, भारीच. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, एकच नंबंर भाऊ, तेवढं मी कुठे बसू ते सागंता का? असा प्रश्न केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.