तुफान राडा! कॉलेजच्या आवारात तरुणींची जोरदार हाणामारी; एकमेकींना धु धु धुतले
सोशल मीडियावर रोज काही ना काही दर सेकंदाला व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट, भांडण यासारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात विशेषत: तरुणींच्या भांडणांचे व्हिडिओ. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुणी जोरदार भांडण करत आहेत.
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओ ग्रेटर नोएडाच्या कॉलेतजमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुली भांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, गुलाबी रंगाची हुडी घातलेल्या मुलीने दुसऱ्या पांढऱ्या रंगाचा चॉप घातलेल्या मुलीची केसं जोरात ओढली आहेत. दोघेही एकमेकींच्या झिंज्या उपटत आहे. तसेच एकमेकींना धपाधप मारत आहेत. एकमेकींना अगदी जमिनीवर लोळवतच त्यांची भांडणे सुरु आहेत. काही वेळानंतर इतर काहीमुली तिथे येतात आणि भांडणे सोडवतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
अब मारपीट में लड़किया भी नहीं है लड़को से कम, दो छात्राओं के बीच जमकर हुयी मारपीट।
ग्रेटर नोएडा के GNIMS कॉलेज का बताया जा रहा है वायरल वीडियो। pic.twitter.com/1S8MACmF6o— Greater Noida West (@GreaterNoidaW) December 21, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन मुली कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडताना आहेत. काही अंतरावर उभे असलेले काही लोकही पाहत आहेत. भांडणामागचे कारण म्हणजे कोणत्या तरी मुलावरुन त्या भांडण करत असल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @GreaterNoidaW या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकजण हा प्रकार पाहून थक्क झाले आहे.
अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखीवल दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मुली भांडताना केस का ओढतात, तर दुसऱ्या एका युजरने अरे काय चाललंय तरी काय असे म्हटले आहे. एका युजरने नक्कीच बॉयफ्रेंडवरुन भांडत असणार असे म्हटले आहे. तर हे रोजंच झालंय असेही एका युजरने म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हसत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.