फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अलीकडे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियातर लोकांच्या मनोरंजनाचे एक उत्तम साधन बनलले आहे. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हसून हसून पोट दुखून आले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर हशा पिकला आहे. या व्हिडिओत एका तरुणाने अशा भन्नाट स्टाईलमध्ये गाडी चालवली आहे की, पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. गाडी चालवण्याची अशी पद्धत तुम्ही कुठे पाहिली नसेल. तुम्हीच पाहा नेमकं काय केले आहे त्याने.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?
का, बाई, रिक्षा, ट्रक किंवा इतर कोणतेही वाहन असो प्रत्येका गाडीला चालवण्यासाठी ड्रायव्हिंग सीट दिलेली असते. सीटवर बसूनच चालक वाहन चालवतो आणि त्यावर नियंत्रण ठेवतो. पण व्हायरल व्हिडिओत काही भलतंच दिसत आहे. एक माणूस रिक्षा लोडरवर प्लायवूड टाकल्यानंतर चालकाला बसण्यासाठी जागाच उरली नाही म्हणून प्लायवूडवर झोपून गाडी चालवत आहे. सध्या याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Found flying Superman in India , the real heavy driver pic.twitter.com/i2gKyzZBfW
— Arya (@WhyyArya) December 14, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @WhyyArya अकाऊंटवर शेअर करण्यत आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, ‘फ्लाइंग स्पायडरमॅन भारतात सापडला, हेवी ड्रायव्हर’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आत्तापर्यत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले आहे की, तो ब्रेक कसा लावेल? दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, फक्त उडायला विसरलो. तिसऱ्याने म्हटले आहे की, हेच पाहायचे बाकी होते. आणखी एकाने भारतात लोक खरोखर वेगळे आहेत असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.