फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच, डान्स, जुगाड, स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवरच पती-पत्नीमध्ये भांडण झाले आहे. दोघेही स्टेशनवर उभे असताना अचानक त्यांच्यात काहीतरी खटकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पत्नीचा राग इतका वाढतो की तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि ती असे काहीतरी करते की, पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी अशी हाणामारी लोकांना आश्चर्यचकित करते.
महिलेने पतीला उचलून फेकले
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-बायको रेल्वे स्टेशनवर उभे आहेत. नवरा बायकोला काहीतरी बोलतो यामुळे महिलेला राग अनावर होतो. महिलेचा राग इतका वाढतो की ती, पतीचे दोन्ही पाय उचलते आणि त्याला जमिनीवर फेकते. या घटनेनंतर महिलेने अनेक बुक्का नवऱ्याला मारल्या आहेत. महिलेची ही प्रतिक्रिया इतकी धक्कादाक होती की, आजूबाजूच्या लोकांनाही आश्चर्य वाटले. दरम्यान, कोणीतरी त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rkjatav3322 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.अनेकांनी या महिलेच्या हिंसक प्रतिक्रियेवर चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांनी या व्हिडिओला विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे. एका युजरने म्हटेल आहे की, बाई काय खात असेल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ चांगलाच आदळला. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बिचार. काय चाललंय काय कोणी कुठेही भांडत असते असेही एकाने म्हटले आहे. तर चौथ्या एकाने नवऱ्याचीच चूक असेल असे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.