अर्रर्र! भर बाजारात तरुणींचा जोरदार राडा; एकमेकींच्या झिंज्या उपटत हाणामारी, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट याशिवाय अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तुम्ही भांडणांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील.
कधी महिलांची तर कधी तरुणींची भांडणे सतत पाहायला मिळतात. कुठे बसमध्ये तर कुठे ट्रेनमध्ये भांडणे सुरु असतात. तसेच अनेकदा भर रस्त्यात, बाजारात भांडणे होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये तीन तरुणी भर रस्त्यात भांडत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक जत्रेचा परिसर दिसत आहे. तिथेच एका दुकानाच्या ठिकाणी तीन तरुणींमध्ये बाद सुरू आहे. काही वेळातच या तरुणींचा शाब्दिक वाद हाणामारीमध्ये बदलतो. त्या तरुणी एकमेकींच्या झिंज्या उपटत हाणामारी करायला लागतात. त्या एकमेकींना अक्षरश: लाथा, बुक्क्या मारताता. एकमेकींचे केस देखील अजीबात सोडत नाहीत. काही वेळाने एक तरुणी त्यांची भांडणे थांबवते. तसेच अनेक लोक तिथेच जमलेले असतात. सगळेजण त्यांची हाणामारी बघण्यात व्यस्थ दिसत आहेत. त्यातीलच एकाने याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @cute_shivani722 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच अनेकांनी मजेशीर अशा प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हे तर रोजचे झाले आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, अरे काय चाललंय तरी काय. तसेच तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, डब्ल्यू, डब्ल्यू फाईटपेक्षा यांची भांडणे पाहण्याच मजा येते. चौथ्या एकाने म्हटले आहे की, हाण अजून, ओढ केसं अशी प्रतिक्रीया दिली आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर कले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.