फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण रील बनवताना असे स्टंट करताता की, यामुळे त्यांच्या जीव धोक्यात येतो. लोकांना अगदी रील बनवण्याचे फेमस होण्याचे वेड लागलेले आहे. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एक चिनी पर्यटक श्रीलंकेला फिरायला गेली होती. त्यावेळी ट्रेनमध्ये तिच्या सोबत अपघात घडला. तीने रील बनवण्यासाठी असा काही स्टंट केला की यामुळे तिला तिचा पाय गमवावा लागला. सध्या या व्हिडिओची चर्चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडालवा आहे. हा व्हिडिओ पाहून हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, असे स्टंट आपल्याला किती महागात पडू शकतात. फक्त फेमस होण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण कितपत योग्य आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी ट्रेनच्या दरवाज्याला लटकून तिला मागच्या बाजूला डोके बाहेर काढले आहे. ती मोतळ्या हवेचा आनंद घेत आहे. तर तिच्या सोबत असलेली एक व्यक्ती याचा व्हिडिओ बनवत आहे. मात्र, काही वेळानंतर ती महिला एका झाडाला धडकते आणि जोरात त्या झुडूपांमध्ये आदळते. ती ट्रेनमधून खाली पडते. ट्रेन अत्यंत वेगात असल्याने रील बनवणाऱ्य.ा व्यक्तीला देखील काही करता येत नाही. सध्या या घटनेचा थरराक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
A Chinese tourist had a heart-stopping moment while traveling on Sri Lanka’s coastal railway line. She fell from the train after being struck by a tree branch while trying to record a video.
Fortunately, she landed on a bush, which broke her fall and miraculously left her… pic.twitter.com/GmKnViyC0U
— Daily Sherlock 🇬🇭 🇺🇸 (@dailysherlock0) December 12, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर dailysherlock0 या अकाऊंयवर शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओला आत्तापर्यत लाको लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती दिली असून सांगण्यात आले आहे की, एक चीनी महिसला श्रीलंकेला पर्यटनासाठी आली होती. दरम्यान तिच्यासबोत हा अपघात घडला. या व्हिडिओला पाहून अनेकांनी अंगावर काटा आल्याचे म्हटले आहे. अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. वेळोवेळी रेल्वेकडून देखील अशा सूचना दिल्या जातात पण लोक तरीही स्टंट करायला जातात आणि आपला जीव गमावून बसतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.