फोटो सौजन्य: व्हायरल व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच अनेकदा काळजाचा ठोका चुकवणारे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहान चिमुकला अचानक रस्त्यावर धावत सुटला आणि इतक्यात असे काही घडले की वडिलांच्या काजाचा ठोका चुकला.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अलीकडे लहान मुले कधी काय करतील सांगता येत नाही. अनेकदा लहान मुलांची काळजी घेणे खूप कठीण जाते. पालकांची थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी ते महागांत पडू शकते. सध्या व्हारस होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. काही सेकंदासाठी वडिलांची नजर चुकली अन् चिमुकला. तुम्ही देखील व्हिडिओ पाहिल्यावर काळजात धस्स होईल. मात्र, हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वडिल स्कूटीवर बसलेले आहेत. त्यांच्या मागे त्यांची छोटी मुलगी बसलेली आहे. तिच्या गणवेशावरुन लक्षात येते की, तिचे वडिल तिला शाळेत घेऊन चालेले आहेत. तेवढ्यात तिथे एक आजोबा येतात मुलीचा टिफिन घेऊन आणि बॅगेत टाकत असतात. त्याच ठिकाणी चिमुकला देखील स्कूटीच्या पुढे उभा असतो. तो अचानक वडिलांचे लक्ष नसते त्याच वेळी रस्त्यावर पळत सुटतो. दरम्यान एका बाडून एक मोठा ट्रक जातो. ट्रक अगदी चिमुकल्याच्या जवळून जातो. यामुळे एका सेकंदासाठी काळजाचा ठोका चुकले. सुदैवाने त्या मुलाला काही होत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ पाहून लक्षात घेण्यासारखे आहे की, लहान मुलांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. एक सेकंदाची नजर चुकली तरी मोठी दुर्घटना घडू शकते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kara_kalanja_bus_premi या अकाऊंटवर शे्र करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहून अनेकजण घाबरले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ही लहान मुले कधी काय करतील सांगता येत नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, व्हिडिओ पाहून मला घामच फुटला. तर अनेकांनी मुलांची काळजी घेण्याचे सल्ले दिले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.