Viral Video: तरुणी टॉवेल गुंडाळून मेट्रोत चढल्या; पाहून लोक हैराण म्हणाले...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत आहे. दर सेकंदाला काही ना काही पाहायला मिळत असते. अनेकदा मनोरंजक तर चित्र-विचित्र अशा गोष्टी पाहायला मिळतात. लोकांना सोशल मीडियाचे रोग लागला आहे. डान्स, जुगाड असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा धोकादायक स्टंट तर कधी विचित्र अशा गोष्टी करतात.
सध्या असाच एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये तरुणींनी असे काही केले आहे की सगळेजण आवाक् झाले आहेत. काही तरुणी मेट्रोमध्ये चक्क टॉवेल गुंडाळून चढल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तसेच यापूर्वी देखील असेच काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ परदेशातील असल्याचे लक्षात येते. हो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मेट्रोतील लोक आवाक्
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुणी मेट्रो स्टेशनवर उभ्या आहेत. विशेष म्हणजे या तरुणी टॉवेल गुंडाळून आहेत. त्या टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये चढतात. त्यांना मेट्रोमध्ये बघून अनेकजण चकित होऊन त्यांच्याकडे पाहात असतात. काहीजण त्यांचे व्हिडिओ बनवतात फोटो काढतात. तसेच काहीजण त्यांच्या सोबत सेल्फी घेतात. त्यामुली देखील इतर लोकांसोबत मस्त पोझ देत असतात. तर काहीजण हा काय प्रकार या दृष्टीने त्यांच्याकडे पाहात असतात. त्या मुली अगदी बिनधास्तपणे मेट्रोत वावरत आहेत जसे की ही गोष्ट त्यांच्यासाठी सामान्य आहे. तसेच मेट्रोतून उतल्यानंतर देखील लोक त्यांच्याकडे पाहतच राहतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामर @mimisskate या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाइक देखील केले आहे. तर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्हाला कोणाची रिएक्शन आवडली. तसेच अनेकांनी यावर आपल्याला प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बाई हा काय प्रकार? तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्यांनी काहीच कपडे घातले नाहीत त्या बिनधास्त कशी फिरत आहेत. अशा आवाक् प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.