फोट सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मेजशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या एक मजेशीर गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हाला माहितच असेल की, कांद्यांच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. तसेच इतर भाज्यांचा देखील किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे सर्व सामान्य लोकांना साधा भाजीपाला देखील विकत घेणे परवडत नाही.
कांद्याची मोफत मागणी
यावर दिल्लीतील एक माणसाने स्विगी फूड मार्टकडे एक मोफत कांद्यांची मागणी केली आहे. सध्या ही मागणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली आहे. या व्यक्तीने कांद्याच्या प्रचंड वाढलेल्या किमतींमुळे हैराण झाला असून रेस्टॉरंटकडे विनंती केलीआहे की, ‘भैय्या, प्लीज गोल कट कांदे पाठवा. कांदे खूप महाग आहेत, यामुळे कांदे विकत घेऊ शकत नाही. कृपया गोल कांदे पाठवा.” या मागणीमुळे सध्या सोशल मीडियावर हशा पिकला आहे.या घटनेनंतर स्विगी इंस्टामार्टने विशेष कांदा फ्लॅश सेलची घोषणा केली, यामुळे दिल्लीतील रहिवासी खुश झाले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या किमतींमुळे साधी भाजीही महागडी झाली आहे. या परिस्थितीत, विनोद हा संकटाशी सामना करण्याचा मार्ग बनला आहे. ही घटना याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
रेस्टॉरंटने देखील ही मागणी मान्य केली
त्याच्या या मागणीचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या कांद्याच्या किमतींमुळे अनेकांसाठी हा साधा भाजीपाला सध्या विकत घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे या विनोदी आणि भावनिक प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर रेस्टॉरंटने देखील ही मागणी मान्य केली असून या व्यक्तीला त्याच्या जेवणासोबत जास्त कांदे पाठवले आहेत. यामुळे त्या व्यक्तीला आनंद झाला आहे. तसेच ही घटना सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेली ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @viralbhayani या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.या पोस्टला सध्या लाखो लोकांनी पाहिले असून लाइक देखील केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मी त्याला एकच कांदा पाठवला असता, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, दिल्लीच्या लोकांची सजर्नशीलत अशाच वेळी दिलते, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, कांद्याला आता सोन्यापेक्षा जास्त भाव आले आहेत. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, स्विगीने हे चक्क मान्य केले त्याला कांदे पाठवले? असा प्रश्न केला आहे. सध्या ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या घटनेने सोशल मीडियावर हशी पिकला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.