viral video grandpa applying nail paint on grandma's Nails Cute video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. तसेच प्रेमी जोडप्यांचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक आजी-आजोबांच्या प्रेमाचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रेमाला वयाचे बंधन नसते, तसेच एकमेकांच्या साथीने आयुष्य आनंदाने जगात येते हे याचे उत्तम उदाहरण आहे. पण नात्यात केवळ प्रेम असून चालत नाही. ते व्यक्तही करता यायला हवे. यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी, गिफ्ट्स यांची गरज नसते, तर अगदी छोटेसे फूल देणे किंवा कधी एखाद्या गोष्टीत एकमेकांना मदत करणे, तसेच एकमेकांचा आदर करणे यातूनही आपले प्रेम व्यक्त करता यायला हवे. याचे गोड असे उदाहरण म्हणजे आजी आजोबांचा हा व्हिडिओ आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजी-आजोबा ट्रेनने प्रवास करत आहे. यादरम्यान आजोबा आजींच्या नखांना नेलपेंट लावून देत आहे. आजींच्या हातात लाल रंगाच्या नेलपेंटची बॉटल आहे. आजींना सीटवर आजोबांसमोर हाथ ठेवला आहे, तर आजोबा हळू आणि व्यवस्थित आजींच्या नखांवर नेलपेंट लावत आहे. आजींना देखील आनंद होत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @iamrohantamhane या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “आजोबा आजींच्या नखांना नेलपेंट लावून देत आहेत आणि आजी हसत आहे, जणू काही आजोबांनी पहिल्यांदाच त्यांना स्पर्श केला आहे, त्यांचे प्रेम जुने नाही, अधिक वाढत चालले आहे”, असे म्हटले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने आजोबांनी सगळ्या महिलांचे मन जिंकले असे लिहिले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने खरे प्रेम असे म्हटले आहे. आणखी काहींनी असाच साथ देणारा साथीदार हवा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.