viral video groom decorated with garland which looking like bouquet video goes viral
अलीकडे सोशल मीडिया हे मनोरंजनाचे उत्तम माध्यम बनलेले आहे. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स, भांडण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असता. याशिवाय तुम्ही लग्नाचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. तुम्ही पाहिलेच असेल कदी नवरा-नवरीच्या डान्सचे तर कधी त्यांच्या नातेवाईकांच्या डान्सचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. याशिवाय नवरा-नवरीला लग्नाच्या वेळी खूप छान तयार होतात. दोघांचेही ड्रेस त्यावर घालायची ज्वेलरी मेकअप, मुंडावळ्या, हार सगळे अगदी व्यवस्थित निवडले जाते. पण अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोकांच्यात नवरा-नवरीला हार घालून, किंवा मोठ्या फुलांच्या मुंडावळ्या बांधून पूर्ण झाकले जाते. नवरा-नवरी अगदी राजा-राणीप्रमाणे नटलेले असता.
सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये नवऱ्याला असा हार घालण्यात आला आहे की, यामुळे तो पूर्ण झाकून गेला आहे. त्याचे फक्त तोंडच दिसत आहे. हे असं झाले आहे की, अंगापेक्षा बोंगा मोठा. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर नवरदेव आणि काही मंडळी दिसत आहे. नवरदेवाला एवढा मोठा हार घातला आहे की, त्याचा फक्त चेहराच दिसत आहे. नवरदेव पूर्णपण त्या हाराच्या ओझ्याने थकलेला दिसत आहे. आजूबाजूला लाेक येऊन फोटो काढून जात आहेत. बिचारा ओझ्याने पूर्ण थकून गेला आहे. तुम्हाला तुम्ही तिथे असता तर खूप वाईटही वाटलं असतं.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @altu.faltu या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मला तर ती लाश वाटली असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने गुलदस्ती कुठे आहे असे विचारले आहे. आणखी एका युजरने त्याला सु लागली तर काय करणार बिचार असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घेतला आहे. या व्हिडिओने सर्वत्र सोशल मीडियावर हशा पिकला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.