'मुझे घर जाना है...' दिल्ली मेट्रोत तरुणीचा अजब ड्रामा; प्रवासी हैराण, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काया पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ, कधी अंगावर काटा आणणारे तर कधी भावुक करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. पण बऱ्याचदा संतापजनक असे व्हिडिओ देखील सतत व्हायरल होत असता. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोणीही काहीही करत असते. तुम्ही दिल्ली मेट्रोतील तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील.
दिल्ली मेट्रोत नेहमीच चर्चेत असते. कधी मेट्रोतील भांडण तर कधी मेट्रोतील अश्लील डान्स, तर कधी मेट्रोत लग्न अशा अनेक गोष्टींवरुन दिल्ली मेट्रो चर्चेचा विषय बनली आहे. सध्या असाच एक दिल्ली मेट्रोतील विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीचा मेट्रोत भलताच ड्रामा सुरु आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोत अनेक प्रवासी बससलेले दिसत आहेत. तर काही प्रवासी उभे राहून प्रवास करत आहेत. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोच्या महिल्यांच्या डब्यातील असून दरवाज्याजवळ काही तरुणी उभ्या असलेल्या दिसत आहे. दरम्यान दोन तरुणी व्हिडिओ बनवत आहेत. एक तरुणी ड्रामा करत असून एक तरुणी तो ड्रामा मोबाईमध्ये रेकॉर्ड करत आहे. ड्रामा करत असलेली तरुणी मेट्रोच्या खांबात हात अडकवते आणि चोर असल्याचा ड्रामा करत असते. ती वेगळ्याच आवाजत मी चोर नाही, मला घरी जाऊद्या असे म्हणत असते. तर व्हिडिओ काढणारी हसत असते. तिच्या अशा वागण्याने प्रवासी हैराण झालेले व्हिडिओत दिसत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Normal day in Delhi Metro 😭 pic.twitter.com/SJbC7ZwXOY
— Vijay (@veejuparmar) February 3, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @veejuparmar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने अरे काय अश्लीलपणा लावलाय असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने अरे आवरा हिला असे म्हटले आहे. अनेकांनी अशा लोकांना मेट्रोत बसून दिले नाही पाहिजे असे म्हटले आहे. काहींनी हे रोजचे झाले आहे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.