viral video jammu man saved calf life who trapped in flood video goes viral
सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक पूरात अडकले आहे. जम्मू देखील पूराच्या विळख्यात अडकला आहे. दरम्यान या परिस्थिती लोक एकमेकांना मदत करत आहे. यामुळे माणूसकीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. याच वेळी सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती गायीच्या वासराला घेऊन पाठीवर घेऊन जात आहे. त्याला पावसापासून वाचवण्यासाठी त्याने प्लॅस्टिकचे घोंगटे अंगवार घेतले आहे.विशेष म्हणजे, हे वासरू पूरामध्ये अडकले होते. याचे प्राण या व्यक्तीने वाचवले आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात अनेक लोक आपला जीव वाचवून दुसऱ्या ठिकाणी निघाले आहे. याच वेळी एक व्यक्ती आपल्या वासरासोबत तिथून बाचावाचा मार्ग काढत आहे. वासरु थंडीने कुडकुडत आहे. यामुळे व्यक्तीने त्याला प्लॅस्टिकने गुंडाळून पाठीवर बांधले आहे. वासराला वाचवणाऱ्या या व्यक्तीचेसध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ नरिंदर सिंग नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. अनेक लोकांनी व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने, माणूसकी आजही जिंवत आहे, असे म्हटले आहे. दुसऱ्या एकाने, ही व्यक्ती एक अनमोल रत्न आहे असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका युजरने या व्यक्तीला माझा सलाम असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या जम्मूमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थितीत अत्यंत बिकट झाली आहे. अनेक डोंगराळ भागात भूस्खलन आणि पूर यामुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. अनेक भागात रस्त आणि घरे पाण्याखाली गेली आहे. सखल भागांमध्ये रहिवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. यातून माणसांप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा हक्का आहे, आणि त्यांना सुरक्षित ठेवणे हे माणसाचे कर्तव्य आहे हे लक्षात येते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.