(फोटो सौजन्य: X)
आपल्या बुद्धीचा चुकीचा वापर करून मानव आधीपासूनच प्राण्यांसोबत चुकीचा व्यवहार करत आला आहे आणि याचेच आणखीन एक उदाहरण आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले आहे. वास्तविक घडलं असं की, केनियाच्या वन्यजीव अभयारण्यात एका पर्यटकाने हत्तीला दारू पाजल्याची घटना घडून आली आहे. व्यक्तीचा हा पराक्रम आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्ये पाहून युजर्समध्ये मात्र आता संतापाची लाट उसळून आली आहे. चला काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
व्हिडिओमध्ये, माणूस प्रथम टस्कर बिअरचा कॅन उघडतो आणि स्वतः पिताना दिसतो पण याचेवेळी तिथे एका हत्तीची एंट्री होते. हत्ती व्यक्ती काय पीत आहे ते बघत असतो आणि तितक्यातच माणूस आपली उरलेली बिअर हत्तीच्या सोंडेत ओतण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत, कारण हत्तीला दारू पाजणे हे केवळ क्रूरच नाही तर प्राण्यांसाठी देखील धोकादायक आहे. मस्ट शेअर न्यूज नावाच्या एका अकाउंटने ते शेअर केले असून तो माणूस स्पॅनिश असल्याचे यात सांगण्यात आले आहे. युजर्स मात्र हे दृश्य पाहून चांगलेच भडकले असून माणसावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी आता काहीजण करत आहेत.
Spanish tourist in Kenya gives beer to elephant
The incident is being investigated by the Kenya Wildlife Service and the relevant authorities. pic.twitter.com/teut0sYhax
— MustShareNews (@MustShareNews) August 29, 2025
दरम्यान केनिया वन्यजीव सेवा (KWS) आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्यास आता सुरुवात केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, KWS ने म्हटले आहे की प्राण्यांना दारू पाजणे क्रूरता आहे आणि कठोर कारवाई केली जाईल. पर्यटकाची अद्याप ओळख पटलेली नाही, परंतु जर पकडले गेले तर त्याला दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो. केनियामध्ये वन्यजीव संरक्षण कायदे खूप कडक आहेत आणि अभयारण्यात अशा वर्तनावर बंदी आहे. व्हिडिओ @MustShareNews नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.