(फोटो सौजन्य: Instagram)
गणेशोत्सवाचा उत्सव म्हटला की लोकांचा उत्सव एकदम उसांडुन वाहू लागतो. भव्य डोकोरेशन, डीजेवर गाणं, डान्स अशा बऱ्याच गोष्टी या सणात रंगून येतात. पण हे सगळं होत असतानाच माणसाची भक्ती मात्र मागे पडत जाते. गणेशोत्वाचा सण हा आनंद साजरा करण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरु करण्यात आला होता पण आता मात्र हा सण शोभेचं एक साधन बनून राहिलं आहे. मोठमोठ्या मुर्त्या, मोठमोठे डीजे, दर्शासाठीची ती लाखोंची रांग आणि वाईट अवस्थेत बाप्पाचा होणारा निरोप समारंभ आपण सर्वांनी पाहिला आहे… पण यातच एक नवीन आणि सर्वांना खुश करणारा एक सुंदर व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात चिमुकल्यांनी आपल्या लहान पण भक्तिमय प्रकल्पातून बाप्पाच्या आगमनाचा आनंद लुटला आहे.
एका महिलेने रस्त्यावर गणेश चतुर्थी साजरी करणाऱ्या तीन लहान मुलांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एका लहान मूलने आपल्या हाताने बनवलेल्या गणपतीची मूर्ती एका छोट्या पाटावर ठेवली आहे आणि यासोबतच इतर मुले आनंदाने या छोट्या बाप्पाची रस्त्यावर मिरवणूक काढत आहेत. यात ना कोणती सजावट होती, ना कोणता डीजेचा आवाज होता तो फक्त बाप्पाच्या येण्याचा आनंद! जेव्हा मुलांनी महिला आपल्याला रेकॉर्ड करत आहे हे पाहिलं, तेव्हा ते डगमगले नाही तर ते आणखीनच उत्साहात नाचायला लागले आणि आनंदाने आपली मूर्ती कॅमेरात दाखवू लागले. त्यांचा हा आनंद आणि बप्पासाठीचे ते निरागस प्रेम पाहून इंटरनेटवर सर्वच खुश झाले आहेत.
कोमल सिंग या महिलेने आपले इंस्टाग्राम अकाउंट @be_bold9193 वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याला आता लाखोंहून अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत. “गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. आज मी या मुलांना रस्त्यावर हाताने बनवलेल्या छोट्या गणपतीच्या मूर्तीसह आनंदाने फिरताना पाहिले. त्यांचा आनंद खूप शुद्ध आणि साधा होता – आणि मला जाणवले की हाच या उत्सवाचा खरा सार आहे: निरागसता, भक्ती आणि एकता.”
ती पुढे म्हणाली, “आजकाल, उत्सव अनेकदा वेगळे दिसतात – डीजे, मोठ्या आवाजातील संगीत आणि आयटम गाण्यांचे वर्चस्व असते, तर मूर्ती शांतपणे मागे येते. मी देखील त्या डीजे मिरवणुकांचा आनंद घेते आणि नाचते – पण मी असा दावा करत नाही की यामुळे मी ‘रूढीवादी’ हिंदू बनते. खरा मुद्दा परंपरा सिद्ध करण्याचा नाही, तर आपण किती प्रेम आणि श्रद्धा पसरवतो हे सिद्ध करण्याचा आहे. आपल्या सर्वांसाठी हा धडा आहे: सण हे आपले उत्सव किती भव्य किंवा आधुनिक दिसतात याबद्दल नसून, आपल्या हृदयात आपण जपलेल्या आत्म्याबद्दल आहेत. चला अशा प्रकारे साजरे करूया की त्याचा अर्थ जिवंत राहील – प्रेम, विश्वास आणि एकतेने, लेबल किंवा द्वेषाने नाही”.
भटक्या कुत्र्यांचा कहर! ७ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला अन्…; पुढं जे घडलं थरारक, Video viral
कोमलने तिच्या कॅप्शनचा शेवट असा केला की, “शेवटी, त्या मुलांनी माझे आभार मानले कारण मी त्यांचा व्हिडिओ बनवला होता. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, खऱ्या उत्सवाचा अर्थ काय आहे याची आठवण करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानायला हवे होते.” सोशल मीडिया वापरकर्त्यांना व्हिडिओ खूप आवडला असून अनेकांनी कमेंट्स करत या व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले, “०% मंडप उभारणे, ०% देणग्या, ०% रस्ते अडवणे, ०% दिखावा, ०% राजकारण, १००% भक्ती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना माहित आहे का की त्यांच्या निरागसतेला १ दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.