Alexa तर सुसंस्कृत निघाली! चिमुकलीने 'असा' प्रश्न विचारला; अलेक्साचे उत्तर ऐकून व्हाल आवाक्, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट असे अनेक गोष्टी दर सेकंदाला पाहायला मिळतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तुम्हाला गुगल, अलेक्सा माहितच असे. हे दोन्ही एक डिजिट व्हॉईस असिस्टंट आहेत.
यावर लोक अनेक त्यांना पडलेले प्रश्न विचारतो जाचे हे असिस्टंट उत्तर देतात. जसे की, तुम्ही म्हणला की, अलेक्सा गाणी निजव किंवा एखादा चित्रपट लाव तर ती तुमचे काम लगेच करते. हे तंत्र आपल्या आदेशांते पालन करते. सध्या असाच काहीसा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकलीने Alexa ला असा प्रश्न विचारला आहे की, त्याचे उत्तर ऐकून आवाक् व्हाल.
चिमुकलीने नेमकं काय विचारले?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली अलेक्सा डिव्हाईसचा आनंद लुटताना दिसत आहे. चिमुकली अलेक्साला तिला चुकीचे वर्तन करण्यास सांगते. हे ऐकून अलेक्सा तिची सुसंस्कृत शैली दाखवते आणि म्हणते, ‘तौबा-तौबा.’ यानंतर, मुलगी आग्रहाने म्हणते, “अलेक्सा, कृपा करुन असे करू नको”, ज्यावर अलेक्साने उत्तर दिते की, ‘नाही, नाही, मी या बाबतीत खूप सुसंस्कृत आहे.’
मुलीला अलेक्साचे उत्तर ऐकून आनंद होतो आणि ती पुन्हा तोच प्रश्न अलेक्साला विचारते. अलेक्सा म्हणते की, तिने शिवी दिली तर तिला शक्तीमानला सॉरी म्हणावे लागेल. तरीही मुलगी एकत नाही आणि म्हणते, “अलेक्सा, प्लीज, नंतर शक्तीमानला सॉरी सांग.” यावेळी अलेक्साने एक नवीन निमित्त काढते आणि म्हणते, “गैरवापर करणे थांबवा, एक कप गरम चहा घ्या.”
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @saiquasalwi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी चिमुकलीची निरागसता खूप आवडली आहे. व्हिडिओ मजेशीर प्रतिक्रीया देखील लोकांनी दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ लहान मुले काय विचारतील बोलतील सांगता येत नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, Alexa सुसंस्कृत आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.