काय म्हणावं! आधी देवाच्या पाया पडला मग लॉकरमधील पैसे घेऊन चोर फरार; VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज काही ना काही दर सेकंदाला व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, तसेच खाद्यपदार्थांचे याशिवाय लग्नासंबंधित असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय सत्य घटनांचे चोरीचे, अपघातांचे असे अनेक व्हिडिओ देखील कॅमेरात कैद झाल्याने आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक चोरीच्या घटनेचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चोरीच्या घटनांचे असे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. बाईकची चोरी, तसेच एटीएम मशीन पैसे पळवल्याचे व्हिडिओ याशिवाय अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ दुकानातील चोरीचा आहे. मात्र, या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. याचे कारण म्हणजे चोरी करण्याआधी चोराने असे काही केले आहे की, अनेकजण चकित झाले आहे. तसेच हा व्हिडिओ मध्यप्रदेशातील असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चोरांनी मध्येप्रदेशमदील बैलुत येथे 11 दुकाने लुटली आहेत. तसेच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गाड्यांच्या ऑइलचे दुकान दिसत आहे. त्याच वेळी एक चोर दुकानाचे शटर फोडून खालून घुसण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या पाठोपाठ आणखी एक चोर आतमध्ये शिरतो. ते दोघे आतमध्ये शिरत असताना थोडेसे सामान खाली पडते. त्यासामानात देवाची देखील मूर्ती असते. त्यातील एक चोर ती मूर्ती उतलतो. त्यानंतर ती टेबलावर ठेवायच्या आधी त्याच्या पाया पडतो. हे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यानंतर दोघेही दुकानातील सामान उचलताता. तसेच लॉकरमधील पैसे देखील चोरुन घेऊन जाताता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
भगवान की फोटो गिर गई, चोर ने उठाई प्रणाम कर माफ़ी माँगी फिर चोरी की! #Viral #Viralvideo #CCTVFootage #THIEF pic.twitter.com/lFdKiQLGYf
— Jyoti Gupta (@jyotigupta_mini) December 10, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @jyotigupta_mini या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले असून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बरोबर आहे त्याचे कोणतेही शुभ काम करण्याआधी देवाचे आसीर्वाद घेणे महत्त्वाचे आहे. आणखी एकाने वाह बेटे! शाब्बास असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.