फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तुम्हाला जर कोणी म्हटले की, दिवसभर फोनशिवाय किंवा एक दोन तास फोन न वापरता राहून दाखवा तर तुम्ही जास्तीत-जास्त अर्धा तास राहून शकाल. याचे कारण म्हणजे अलीकडे लोकांना फोनचे एवढे व्यसन लागले आहे की लोक झोपता, उठता बसता, खाता-पिता फोनचा वापर करत असतात. मोबाईल जीवन जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. रील्स, मेसेज, कॉल्स यांशिवाय लोकांना चैन पडत नाही.
पण चीनच्या एका महिलेने हे करुन दाखवले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला यामुळे लखपती बनलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने चीनमधील एका स्पर्धेत अनोख्या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना मोबाईलचा वापर करण्यास बंदी होती. स्पर्धकांना मोबाईल वापरण्याशिवाय काहीही कराण्यास परवानगी होती. सध्या सोशल मीडियावर या अनोख्या नो मोबाईलफो चॅलेंजची’ चर्चा सुरु आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
स्पर्धेचे बक्षिस
“नो मोबाईल फोन चॅलेंज” नावाची ही स्पर्धा मानसिक तणाव आणि संयमाची कसोटी पाहणारी होती. या स्पर्धेत 10,000 युआन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 1 लाख 16 हजार रुपये जिंकण्याचे बक्षीस ठेवले होते. 29 नोव्हेंबर रोजी एका शॉपिंग सेंटरमध्ये ही स्पर्धा झाली. या अनोख्या उपक्रमात 100 अर्जांपैकी केवळ दहा जणांची निवड करण्यात आली होती. स्पर्धकांना मोबाइल, लॅपटॉप किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई होती.
सर्व गोष्टींची सोय बेडवरच
शांतपणे आणि तणावमुक्त राहणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धकांचे मोबाइल फोन आयोजकांनी काढून घेतले होते, आणि फक्त आपत्कालीन वापरासाठी एक जुना फोन ठेवला होता. स्पर्धकांना पूर्ण वेळ बेडवर राहणे बंधनकारक होते. केवळ पाच मिनिटांसाठी शौचालयासाठी ब्रेक मिळायचा. झोपण्यास मनाई होती, त्यामुळे स्पर्धकांनी वेळ घालवण्यासाठी पुस्तक वाचन आणि विचारमग्न राहणे पसंत केले. तणावमापनासाठी मनगटावर इलेक्ट्रॉनिक पट्टा लावण्यात आला होता, आणि जेवण व पाण्याची सोयही बेडवरच करण्यात आली होती.
ही स्पर्धा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक सहनशक्तीची होती. यात डोंग नावाच्या महिलेने बाजी मारली. ती 8 तास मोबाईशिवाय राहिली. सर्वांत कमी तणाव तिच्यात दिसला आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले. फायनान्स कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या डोंगने आपल्या संयमी स्वभावामुळे बक्षीस जिंकले.
चिनी सोशल मीडियावर डोंगला “पायजामा सिस्टर” हे टोपणनाव मिळाले आहे. तिच्या साध्या जीवनशैलीचा आणि संयमी स्वभावाचा मोठा फायदा तिला या स्पर्धेत झाला. गादी आणि बेडच्या दुकानात झालेली ही स्पर्धा जरी प्रायोजक कंपनीच्या हेतूबाबत गुप्त असली तरी, जगभरात या उपक्रमाची जोरदार चर्चा रंगत आहे. मोबाईलशिवाय शांततेत वेळ घालवण्याचा हा अभिनव उपक्रम लोकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.