
shocking viral video
पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीला एकटे पाहताच घरात घुसण्याचा प्रयत्न केला. डिलिव्हरी बॉय सुरुवातीला मुलीला प्रश्न विचारतो आणि यानंतर दरवाजा उघडून घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. याच वेळी मुलीची आई तिथे येते. नराधम घरात घुसत असल्याचे पाहताच आईला संताप येतो ती त्याला चांगलीच सुनावते. कोणच्याही घरात असे घुसायचे नसते असे ती कडक शब्दात सांगते. यावर डिलिव्हरी बॉय पार्सलचा फोटो काढण्याचा बहाणा देतो. यावर मुलीची आई म्हणते की, प्रत्येकाची प्रायव्हसी असते, असे कोणच्याही घरात तुम्ही घुसू शकत नाही असे ओरडून सांगते.
A delivery guy thought the girl is alone at the home, somehow he tried to get inside.. but the mother was there and she confronted the guy.. Hat’s off 🙌 Never ever trust anyone for the sake of delivery proof or something, because you don’t know their intention.. pic.twitter.com/PIZCStMZC1 — Aaj Ka Lafda (@aajka_Lafda) July 18, 2026
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @aajka_Lafda या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी महिलेचे कौतुक केले असून डिलिव्हरी बॉय किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेकांनी अशा नरधामांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.
CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.